रत्नागिरी - भरकटलेल्या जहाजावरील सर्व 13 कर्मचाऱ्यांची सुखरूप सुटका करण्यात आली आहे. हे जहाज दुबईहून कारवारला गेलं होतं, त्यानंतर पुन्हा परतीच्या प्रवासाला लागले होते. मात्र, समुद्रात निसर्ग चक्रीवादळाच्या संकटाची सूचना मिळाल्यानंतर हे जहाज रत्नागिरीतल्या भगवती ब्रेकवॉटरजवळ आश्रयाला आले होते. मात्र, आज (बुधवार) सकाळी अँकरसकट हे जहाज भरकटले. त्यानंतर ते जहाज मिऱ्या समुद्रकिनारी धडकले. जहाजातील या सर्व खलाशांना स्थानिक प्रशान आणि ग्रामस्थांनी सुखरूप बाहेर काढले आहे. या सर्व खलाशांची स्वॅब टेस्ट करून क्वारंटाईन करण्यात येणार असल्याची माहिती, उच्च शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिली.
'भरकटलेल्या जहाजावरील सर्व 13 खलाशांची सुखरूप सुटका' - sailors rescued news
भरकटलेल्या जहाजातील 13 खलाशांची मिऱ्या समुद्रकिनारी सुखरुप सुटका करण्यात आली. या सर्व खलाशांची स्वॅब टेस्ट करून क्वारंटाईन करण्यात येणार असल्याची माहिती, उच्च शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिली.
डिझेल वाहून नेणारं हे जहाज दुबईवरुन मुंबई-जयगड नंतर कारवारला गेलं. कारवारला डिझेल खाली करुन हे जहाज परतीच्या मार्गाला लागलं होतं. मात्र, वादळ येण्याची माहीती मिळाल्यानंतर रत्नागिरीच्या भगवती समुद्र किनाऱ्यावरील ब्रेक वॉटरवाॉल येथे हे जहाज अँकर टाकून उभं करण्यात आलं होतं. मात्र, प्रचंड वादळ आणि अजस्र लाटांमुळे हे जहाज अँकरसकट समुद्रात भरकटले. त्यानंतर हे जहाज मिऱ्या समुद्रकिनारी धडकलं. या जहाजावर 13 खलाशी होते. या खलाशांना स्थानिक प्रशान आणि ग्रामस्थांनी सुखरूप बाहेर काढलं आहे. यातील 10 खलाशी हे भारतीय तर 3 खलाशी परदेशी असल्याची माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली. तसेच या जहाजावर परदेशी खलाशी असल्याने या सर्व खलाशांची स्वॅब टेस्ट करून क्वारंटाईन करण्यात येणार असल्याची माहिती मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे.