रायगड - कोरोनाचे संकट सर्वांच्या डोक्यावर घोंघावत असताना जिल्ह्यात पाणीटंचाई समस्या ही उन्हाळ्यात नागरिकांच्या पाचवीला पुजली आहे. कोरोना पार्श्वभूमीवर शासनाने लॉकडाऊन जाहीर केल्याने सर्व घरी असल्याने कामधंदा बंद आहे. महाड तालुक्यातील किल्ले रायगडच्या पायथ्याशी असलेल्या खर्डी गावातील तरुणांनी लॉकडाऊनचा फायदा घेऊन नदीपात्रातील विहीरीची स्वच्छता तसेच बंधाऱ्यातील गाळ काढण्याचे काम हाती घेतले आहे. श्रमदानातून तरुणाईने एकत्रित काम केल्याने खर्डी गावातील पाणी टंचाई समस्या सुटण्यास मदत झाली आहे.
रायगड : श्रमदानातून खर्डी गावातील विहीर आणि बंधारा केला स्वच्छ - कोरोना बातमी
महाड तालुक्यातील किल्ले रायगडच्या पायथ्याशी असलेल्या खर्डी गावातील तरुणांनी लॉकडाऊनचा फायदा घेऊन नदीपात्रातील विहीरीची स्वच्छता तसेच बंधाऱ्यातील गाळ काढण्याचे काम हाती घेतले आहे. श्रमदानातून तरुणाईने एकत्रित काम केल्याने खर्डी गावातील पाणीटंचाई समस्या सुटण्यास मदत झाली आहे.
![रायगड : श्रमदानातून खर्डी गावातील विहीर आणि बंधारा केला स्वच्छ विहिर स्वच्छ करताना युवक](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-7003324-1046-7003324-1588247069541.jpg)
पाणीटंचाईचे हे संकट दूर करण्यासाठी गावातील तरुणांनी पाऊल उचलले असून गावात वाहणाऱ्या नदीच्या पात्रात असलेल्या विहिरीतील गाळ काढून, नैसर्गिक झरे उघडे केल्याने विहिरीत पाणी वाढण्यास मदत झाली आहे. तसेच नदीत बांधलेल्या बंधाऱ्यात साचलेला गाळ ही काढण्यात आला आहे. त्यामुळे पावसाळ्यात या बंधाऱ्यात मुबलक पाणी साचण्यास मदत मिळणार आहे. कोरोनामुळे सर्वच जण घरी असल्याने गावातील तरुणांनाही पुढाकार घेतला आहे. सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून गावकऱ्यांनी हे काम सुरू केले आहे. श्रमदानातून कोरोना काळात संचारबंदीचा योग्य उपयोग करून गावातील पाण्याचा प्रश्न सुटण्यासाठी तरुणाईने पाऊल उचलले असल्याने या उपक्रमाची सर्वत्र चर्चा होत आहे.