महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

खालापूर शहरावर आता राहणार तिसऱ्या डोळ्याची नजर - khalapur police station news

पोलीस अधीक्षक रायगड अशोक दुधे यांनी आपले विचार व्यक्त करताना खालापूरचे पोलीस निरीक्षक अनिल विभूते यांचे काम चांगले आहे. त्यामुळे त्याचे काम आता अधिक वाढले आहे, तालुक्याचा अधिकारी व जबाबदार नागरिक एकत्र आल्यास नक्कीच चांगले काम होते असे आवर्जून सांगत असताना खालापूरच्या कामकाजबद्दल दुधे यांनी कौतुक केले.

पोलीस अधीक्षक रायगड अशोक दुधे
पोलीस अधीक्षक अशोक दुधे

By

Published : May 30, 2021, 12:24 PM IST

Updated : May 30, 2021, 2:05 PM IST

खालापूर (रायगड )- नगरपंचायत व खालापूर पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमाने शहरात व इतर ठिकाणी लोकसहभागातून सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. या कॅमेऱ्यांचा लोकार्पण सोहळा शुक्रवारी, २८ मे रोजी, रायगड पोलीस अधीक्षक अशोक दुधे यांच्या हस्ते करण्यात आले आता खालापूर शहरावर तिसऱ्या डोळ्याची नजर असणार आहे.

खालापूर पोलीसांचा निर्धार

पोलीस अधीक्षक रायगड अशोक दुधे
खालापूर तालुक्यातून दोन महामार्ग गेल्याने विविध क्राईमच्या घटना वारंवार घडत असल्याने त्यांचा उलगडा होण्याकरिता या सुविधेचा मोठा उपयोग होणार आहे. यावेळी तालुक्यात जबाबदार अधिकारी आणि जबाबदार नागरिक एकत्र आल्यास चांगले काम होते. त्यामुळे खालापुरात १० चे १०० कॅमेरे लवकरच कार्यन्वीत होतील असा विश्वास खालापूर पोलीसांनीव्यक्त केला. खालापूर शहर हे तालुक्याचे एक मुख्य ठिकाण आहे. येथे सर्व सरकारी कार्यालये व पोलिस ठाणे असल्याने आपल्या कामासाठी दररोज येथे तालुक्यातील ग्रामीण भागासह शहरातील नागरिकांची वर्दळ असते. त्यामुळे येथील स्थानिक प्रशासन, खालापूर पोलिस ठाणे, खालापूर नगरपंचायत तसेच पनवेलचे विरोधीपक्ष नेते प्रीतम म्हात्रे यांच्या सहकार्यातून एक पाऊल टाकले आहे. शहरातील कायदा सुव्यवस्था व गुन्हेगारी यावर नजर ठेवण्यासाठी, शहरात नाविण्यपूर्ण लोकसहभागातून सी.सी.टीव्ही कॅमेरे बसवून घेतले आहेत. कॅमेराचा लोकार्पण सोहळा शुक्रवारी रायगड पोलीस अधीक्षक अशोक दुधे यांच्या हस्ते खालापूर शहरात संपन्न झाला.

पोलिस अधीक्षकांच्याहस्ते लोकार्पण सोहळा

याप्रसंगी पोलीस अधीक्षक रायगड अशोक दुधे यांनी आपले विचार व्यक्त करताना खालापूरचे पोलीस निरीक्षक अनिल विभूते यांचे काम चांगले आहे. त्यामुळे त्याचे काम या अधिक वाढले आहे, तालुक्याचा अधिकारी व जबाबदार नागरिक एकत्र आल्यास नक्कीच चांगले काम होते असे आवर्जून सांगत असताना खालापूरच्या कामकाजबद्दल दुधे यांनी कौतुक केले.

यावेळी खालापूर उपविभागीय अधिकारी संजय शुक्ला, पोलीस निरीक्षक अनिल विभूते, तहसीलदार इरेश चप्पलवार, खालापूरच्या मुख्याधिकारी सुरेखा भणगे, उप सहाय्य पोलिस निरिक्षक संजय बांगर, सह्य पोलिस निरिक्षक शेखर लव्हे, पोलिस उपनिरिक्षक स्वप्नील सावंतदेसाई यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

सी.सी.टीव्हीचा तिसरा डोळा नजर ठेवणार
तर आता खालापूर शहरावर आता सी.सी.टीव्हीचा तिसरा डोळा नजर ठेवणार आहे. यामुळे शाळा परिसरात टवाळखोरवरही वचक बसणार व गुन्हेगारीला आळा लावण्यास पोलीस प्रशासनाला मदत होणार आहे. यामुळे शहरवासीयांनी समाधान व्यक्त केले आहे. याप्रसंगी कार्यक्रमाचे प्रास्ताविक पोलीस निरिक्षक अनिल विभूते यांनी करताना, 2 लाख 74 हजाराचा प्रस्ताव तयार करून लोकसहभागातून हा उपक्रम राबवित असताना या सी.सी.टीव्ही च्या देखभालीसाठी नगरपंचायतीने जबाबदारी घेतल्याचे सांगून येथील जनता ही सुज्ञ असल्याचे सांगितले. त्यामुळे सध्या दहा कॅमेरे नजर ठेवणार आहेत, मात्र त्याचे शंभर कॅमेरे होतील यात शंका नसल्याचे त्यांनी सांगितले.

हेही वाचा-खाकी वर्दीतील अन्नदाता; कोरोना काळात भुकेल्यांचा पोषणकर्ता

Last Updated : May 30, 2021, 2:05 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details