रायगड - ऐन गणेशोत्सवावेळी वरूणराजाने वक्रदृष्टी टाकली आहे. काल (बुधवार) जिल्ह्यात पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली होती. आज पहाटेपासून पावसाने विश्रांती घेतली होती. मात्र, पुन्हा पावसाचा जोर हा कमी जास्त होत असल्यामुळे नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे.
रायगडात पुन्हा पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता, जिल्हा प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा - सतर्क
आज पहाटेपासून पावसाने विश्रांती घेतली होती. मात्र, पुन्हा पावसाचा जोर हा कमी जास्त होत असल्यामुळे नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे.
![रायगडात पुन्हा पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता, जिल्हा प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-4343695-thumbnail-3x2-rai.jpg)
रायगडात मुसळधार
रायगडात पुन्हा पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता
आज जिल्ह्यातील अलिबाग येथे १२५ मिमी, पेण १०५ मिमी, मुरुड ९४ मिमी, पनवेल १८८.०४, कर्जत १५१.०४ मिमी, उरण १०३ मिमी, खालापूर १०२ मिमी, माणगाव ११० मिमी, रोहा १५८ मिमी, सुधागड १३८ मिमी, तळा १४७ मिमी, महाड ५६ मिमी, पोलादपूर १४० मिमी, म्हसळा ९९ मिमी, श्रीवर्धन १०० मिमी, माथेरान २०३.०४ मिमी पाऊस पडला आहे. जिल्ह्यात ५ सप्टेंबर रोजी एकूण २०१९.१२ मिमी पाऊस पडला असून सरासरी १२६.२० टक्के पावसाची नोंद झाली आहे.