महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पनवेलमधील कोरोनाबाधितांची संख्या 32 वर; तिघांची प्रकृती गंभीर

सद्यस्थितीत पनवेल तालुक्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 30 तर रायगड जिल्ह्याचा आकडा 32 वर गेला आहे. पनवेल महानगरपालिका हद्दीतील 26, उलवे परिसरातील 4 आणि उरणमधील 2 नागरिकांचा समावेश आहे. यात तिघांची प्रकृत्ती गंभीर आहे.

Panvel Corona News
पनवेल कोरोना न्यूज

By

Published : Apr 16, 2020, 10:50 AM IST

रायगड - पनवेल परिसरातील कोरोनाबाधितांचा आकडा 32 वर पोहोचला आहे. पनवेल महानगरपालिका हद्दीतील 26, उलवे परिसरातील 4 आणि उरणमधील 2 नागरिकांचा समावेश आहे. यात तिघांची प्रकृत्ती गंभीर आहे. बुधवारी महापालिकाक्षेत्रात कोरोनाचे तीन नवीन रूग्ण समोर आले आहेत. यातील दोघे पनवेलमध्ये आढळलेल्या ओला चालकाच्या घरातील सदस्य असून, एक व्यक्ती घोट गावातील आहे या तिघांनाही उपचारासाठी दाखल केले आहे.

पनवेलमधील कोरोनाबाधितांची संख्या 32 वर

सद्यस्थितीत पनवेल तालुक्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 30 तर रायगड जिल्ह्याचा आकडा 32 वर गेला आहे. जुन्या पनवेल शहरातील कोरोनाबाधित ओला चालकाच्या घरातील 10 सदस्यांची तपासणी केली असता, त्यापैकी दोघे पॉझिटिव्ह असून सहा सदस्यांचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत. उर्वरित दोन सदस्यांचा अहवाल येणे बाकी आहे. पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील घोट गावातील एक व्यक्ती 23 मार्चपासून स्वादुपिंडाच्या आजारावर उपचार घेण्यासाठी सायन हॉस्पिटलमध्ये दाखल होता. त्यालाही कोरोनाची लागण झाली असल्याचे त्याच्या अहवालात स्पष्ट झाले आहे.

संबंधित तरुणाच्या आई-वडिलांची तपासणी करण्यात आली असून त्यांचे अहवाल येणे बाकी आहे. सद्यस्थितीत त्यांना खारघरच्या ग्राम विकास भवनमध्ये विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. पनवेल परिसरात एकूण 347 जणांची कोरोनासंदर्भात चाचणी करण्यात आली आहे यात 32 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत .

ABOUT THE AUTHOR

...view details