रायगड- खोपोली शहरात सध्या पुराच्या संकटातून सावरत असताना अनेक वेळा चोरीच्या घटना कानावर येत आहेत. मात्र, रविवारी चक्क खोपोली नगरपालिका रुग्णालयाच्या आवारातून आई वडीलाबरोबर आलेल्या दोन वर्षाच्या लहानग्याला त्यांच्यासोबत आलेल्या व्यक्तीने पळवल्याची घटना घडली आहे. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. या व्यक्तीचा खोपोली पोलिसांसह सामाजिक कार्यकर्ते शोध घेत आहेत.
लहानग्याचा शोध सुरुच
याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधीक माहिती अशी की, खोपोली शिळफाटा येथील मुळगाव धनगरवाडा येथे वास्तव्यात असणारे सोमनाथ आप्पा घाटे व त्याची पत्नी लहान 2 वर्षांचा मुलगा समर्थ हे कुटुंब 10 दिवसांपूर्वी औरंगाबादेतील कामाच्या ठिकाणाहून आले होते. त्यांच्या सोबत एक त्याठिकाणी ओळख झालेला व्यक्ती गजा हा देखील खोपोली येथे येऊन वास्तव्य करत होता. रविवारी सोमनाथ यांच्या पत्नीच्या पोटात दुख असल्याने पती-पत्नी, लहान मुलगा समर्थ व त्याच्या सोबत आलेला गजा हे सर्वजण रिक्षाने खोपोली शहरात असणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात उपचारासाठी आले. त्यांचा दोन वर्षाचा मुलगा समर्थ त्याच्याबरोबर आलेल्या गजाकडे होता. काही वेळानंतर गजाने या समर्थला घेऊन पळ काढला. काही वेळाने ही बाब सोमनाथ घाटे यांच्या लक्षात आली. त्यानंतर त्याने आपल्या दोन वर्षाच्या समर्थचा शोध घेतला. मात्र, तो कोठेच सापडला नाही.
सीसीटीव्हीत सर्व प्रकार कैद