रायगड - पेण शहरातील एका अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी जबरदस्तीने वारंवार शारीरिक संबंध ठेवणाऱ्या आरोपीला, पेण पोलिसांनी अटक केली आहे. श्रेयस सुरेश बाटे (वय 19 राहणार बाटेवाडा, नंदीमाळ नाका) असे या व्यक्तीचे नाव आहे.
लग्नाचे आमिष दाखवत ठेवले शारीरिक संबंध, मुलगी झाली ५ महिन्यांची गर्भवती - लग्नाचे आमिष दाखवत ठेवले शारीरिक संबंध
अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी जबरदस्तीने वारंवार शारीरिक संबंध ठेवणाऱ्या आरोपीला, पेण पोलिसांनी अटक केली आहे.
![लग्नाचे आमिष दाखवत ठेवले शारीरिक संबंध, मुलगी झाली ५ महिन्यांची गर्भवती प्रतिकात्मक फोटो](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-12111635-thumbnail-3x2-pen.jpg)
प्रतिकात्मक फोटो
पोलीस विभाग
मुलगी 5 महीन्याची गर्भवती
श्रेयसने (1 डिसेंबर 2020 ते 8 जून 2021)या कालावधीत सदर अल्पवयीन मुलीशी जबरदस्तीने वारंवार शारीरिक संबंध ठेवल्याने ही अल्पवयीन मुलगी 5 महीन्यांची गर्भवती राहिली आहे. या घटनेबाबत मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून पेण पोलिसांनी संशयित आरोपी श्रेयस बाटे याच्याविरूद्ध गुन्हा नोंद करत, त्याला अटक केली आहे. उप विभागीय पोलीस अधिकारी विभा चव्हाण, पोलीस निरीक्षक गौरीप्रसाद हिरेमठ यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक मीनल शिंदे या अधिक तपास करत आहेत.