महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

रिलायन्स कंपनीच्या गेटबाहेर आगी, अग्निशमन दल घटनास्थळी दाखल - अग्निशमन दलाचे आग विझवण्याचे प्रयत्न

पोयोनाड नागोठाणे येथील रिलायन्स कंपनीच्या कडसुरे गेटनजीक अचानक आग लागली. घटनास्थळी अग्निशमन दल दाखल झाले असून आग विझविण्याचे काम सुरू आहेत.

the-fire-broke-out-outside-the-reliance-company-gate-in-nagothane
रिलायन्स कंपनीच्या गेटबाहेर आगीचे थैमान, अग्निशमन दलाकडून आग विझविण्याचा प्रयत्न

By

Published : Mar 30, 2020, 10:01 PM IST

रायगड - पोयनाड नागोठणे रस्त्यावरील रिलायन्स कंपनीच्या कडसुरे गेटनजीक सायंकाळी अचानक आग लागल्याची घटना घडली असून एकाच वेळी दोन ते तीन ठिकाणी ही आग लागली आहे. रिलायन्स कंपनीच्या अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले असून आग विझविण्याचा प्रयत्न करीत आहेत. आग ही दोन ते तीन ठिकाणी लागल्याने नागरिक भयभीत झाले आहेत.

रिलायन्स कंपनीच्या गेटबाहेर आगीचे थैमान, अग्निशमन दलाकडून आग विझविण्याचा प्रयत्न

वेलशेत पोलीस दुरक्षेत्र नजीक ही आग अधिक भडकली आहे. मात्र, आग नक्की कशाने लागली याचे कारण कळले नाही. याठीकाणी रिलायन्स कंपनीचे साहित्य असल्याने धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. अग्निशमन दलाकडून आग विझविण्याचा शर्थीचा प्रयत्न सुरू आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details