महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Murder In Raigad : जमिनीच्या वादातून सख्ख्या भावानेच केली भावाची गोळ्या झाडून हत्या - Dadar Sagari Police Station

पेण तालुक्यातील ( Pen In Raigad District ) हनुमानपाडा येथील भावानेच आपल्या सख्ख्या भावाची जमिनीच्या वादातून घराच्या अंगणात हत्या ( Brothers Murder In Land Dispute ) केल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यात राम हरिभाऊ पाटील यांचा जागीच मृत्यू झाला. फरार खुनी भावाला दादर सागरी पोलिसांनी काही तासातच पनवेल येथून अटक ( Police Arrested Murder Accused ) केली.

भावाची गोळ्या झाडून हत्या
भावाची गोळ्या झाडून हत्या

By

Published : Dec 28, 2021, 3:36 PM IST

रायगड (पेण) - वडिलोपार्जित जमिनीच्या वादातून सख्ख्या भावानेच भावाची हत्या ( Brothers Murder In Land Dispute ) केली आहे. रायगड जिल्ह्यातल्या पेण ( Pen In Raigad District ) तालुक्यातील हनुमानपाडा येथे हा प्रकार घडला. हल्लेखोर भावाला पोलिसांनी तात्काळ जेरबंद केले ( Police Arrested Murder Accused ) आहे. बंदुकीतून गोळ्या झाडात त्याने भावाचा खून केला.


घरासमोरच झाला वाद

सविस्तर घटना अशी की, फिर्यादी संतोष राम पाटील (वय 40, रा.हनुमानपाडा) यांचे वडील राम हरिभाऊ पाटील व काका पांडुरंग हरिभाऊ पाटील यांच्यात गेल्या काही वर्षांपासून वडिलोपार्जित जमिनीच्या गुरांच्या वाड्याच्या वाटपावरून वाद चालू होता. रविवार 26 डिसेंबर रोजी परेश पांडुरंग पाटील व राम हरिभाऊ पाटील यांची पत्नी प्रभावती व मुलगा संतोष यांच्यामध्ये घरासमोर वाद झाला. सदर वाद मिटल्यानंतर संतोष पाटील व त्याची आई प्रभावती पाटील हे दोघे त्याबाबत तक्रार देण्यास दादर सागरी पोलीस ठाण्यात आले. हे पाहून पांडुरंग हरीभाऊ पाटील, परेश पांडुरंग पाटील व शैला पांडुरंग पाटील (सर्व राहणार हनुमानपाडा) हे फिर्यादी संतोष राम पाटील यांच्या घराच्या अंगणात गेले. तेथे त्यांनी राम पाटील यांना शिवीगाळ केली. पांडुरंग हरीभाऊ पाटील याने त्याच्याजवळ असणाऱ्या बारा बोर बंदुकीतून राम पाटील यांच्या छाती व पोटाच्या खाली गोळ्या झाडल्या. त्यात राम हरिभाऊ पाटील यांचा जागीच मृत्यू झाला.

आरोपीला शिताफीने पकडले

घटनेची माहिती मिळताच डीवायएसपी विभा चव्हाण ( DYSP Vibha Chavhan ) यांनी तातडीने घटनास्थळी भेट दिली. त्यांनी या घटनेच्या तपासाबाबत सूचना दिल्या. त्यानुसार दादर सागरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गोविंद पाटील यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उप निरीक्षक भउड, भुसाने, पोलीस हवालदार मुंडे, कोकरे, जाधव, पाटील यांचे पथक तयार करण्यात आले. पथकाने महिला आरोपी शैला पांडुरंग पाटील हिला ताब्यात घेऊन तिची सखोल चौकशी केली असता तिने फरार आरोपी पती व मुलगा हे पनवेल येथे गेले असल्याचे सांगितले. या माहितीवरून पथकाने पनवेल येथे जाऊन शिताफीने पांडुरंग पाटील व परेश पाटील यांना काही तासातच ताब्यात घेतले. याबाबत दादर सागरी पोलीस ठाण्यात (Dadar Sagari Police Station ) भा.दं.वि. कलम 302/34 सह भारतीय हत्यार कायदा कलम 3 /25/27 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details