रायगड : पेण तालुक्यातील कळवे गावात चोरीच्या उद्देशाने रात्री घरात घुसलेल्या चोरट्याने पती आणि पत्नीवर धारदार हत्याराने वार केले. या घटनेत दोघेही जखमी झाले असून त्यांपैकी पत्नीची अवस्था गंभीर आहे. या दोघांवर पेण येथील म्हात्रे रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अशोक पाटील व मंजुळा पाटील अशी हल्ल्यात जखमी झालेल्या पती-पत्नीची नावे आहेत.
चोरीच्या उद्देशाने पती-पत्नीवर हल्ला, पत्नी गंभीर जखमी.. - पेण पती-पत्नी हल्ला बातमी
पेण तालुक्यातील कळवे गावात चोरीच्या उद्देशाने घरात घुसलेल्या चोरट्याने पती-पत्नीवर धारदार शस्त्राने वार केले. या घटनेत दोघेही जखमी झाले असून पत्नी गंभीर आहे. या दोघांनाही उपचारासाठी पेण येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
![चोरीच्या उद्देशाने पती-पत्नीवर हल्ला, पत्नी गंभीर जखमी.. चोरीच्या उद्देश्याने पती पत्नीवर हल्ला](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-07:25:35:1594562135-mh-rai-95-patipatnihalla-vis-mhc10072-12072020191751-1207f-1594561671-869.jpg)
अशोक पाटील हे कुटुंबासह कळवे गावात राहतात. शनिवारी रात्री ते नेहमीप्रमाणे जेवण करुन झोपले असताना, मध्यरात्री एकच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने त्यांच्या घराच्या पाठीमागील दरवाजा उचकटून घरात प्रवेश केला. यानंतर, पाटील यांच्यावर एका धारदार हत्याराने वार करुन त्यांच्या गळ्यातील सहा तोळे सोन्याची चेन हिसकावून घेऊन सदर अज्ञात व्यक्ती पळून गेला. या हल्ल्यात अशोक पाटील व त्यांची पत्नी मंजुळा पाटील हे दोघेही जखमी झाले असून त्यापैकी मंजुळा पाटील या गंभीर जखमी झाल्या आहेत.
खताचे व्यापारी असणारे अशोक पाटील हे हमरापूर विभागात प्रसिद्ध आहेत. त्यांचा व्यवसायदेखील मोठा आहे. त्यामुळे त्यांच्यावर झालेल्या या हल्ल्याचे वृत्त समजताच अनेकांना धक्का बसला असून, या भागात खळबळ उडाली आहे. या घटनेचे वृत्त कळताच पेणचे उपविभागीय पोलीस अधिकारी नितिन जाधव व दादर सागरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पवार यांनी तातडीने घटनास्थळी भेट दिली. घटनास्थळी अलिबागचे श्वान पथकदेखील दाखल झाले होते. मात्र, मुसळधार पाऊस सुरू असल्याने तपासात अडचणी येत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.