महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पेणमध्ये भटक्या कुत्र्यांची दहशत - stray dogs news pen raigad

मागील अनेक दिवसांपासून पेणमध्ये भटक्या कुत्र्यांची दहशत वाढली आहे. रात्री कामावरुन परतणाऱ्यांना या भटक्या कुत्र्यांचा त्रास जास्त प्रमाणात जाणवत आहे. तसेच रात्री मोटरसायकल चालकांच्या मागे कुत्रे लागतात.

पेणमध्ये भटक्या कुत्र्यांची दहशत

By

Published : Nov 14, 2019, 11:32 PM IST

रायगड - पेण शहरासह मागील दोन दिवसांत तालुक्यात पिसाळलेल्या भटक्या कुत्र्यांनी 25 जणांना चावा घेऊन जखमी केले आहे. या घटनांमुळे पेणमध्ये पिसाळलेल्या भटक्या कुत्र्यांची पुन्हा एकदा दहशत निर्माण झाली आहे. या आधी देखील पावसाळ्याच्या सुरुवातीला उपजिल्हा रुग्णालयाच्या नोंदी नुसार जूनमध्ये भटक्या कुत्र्यांनी 52 जणांना जखमी केले होते.

हेही वाचा-सध्याची राजकीय अस्थिरता परवडणार नाही, प्रमुख पक्षांनी सरकार स्थापन करावे - संभाजीराजे

मागील अनेक दिवसांपासून पेणमध्ये भटक्या कुत्र्यांची दहशत वाढली आहे. रात्री कामावरुन परतणाऱ्यांना या भटक्या कुत्र्यांचा त्रास जास्त प्रमाणात जाणवत आहे. तसेच रात्री मोटरसायकल चालकांच्या मागे कुत्रे लागतात. त्यामुळे मोटारसायकलचे अपघात देखील झाले आहेत. या वर्षी पावसाळ्याच्या सुरुवातीला 16 जून ते 19 जून दरम्यान पेण शहरातील 37 जणांना भटक्या कुत्र्यांनी चावा घेतला. तर पेण तालुक्यात 15 जणांना या भटक्या कुत्र्यांनी जखमी केले होते. आता पुन्हा एकदा या भटक्या कुत्र्यांची दहशत निर्माण झाली आहे.12 ते 13 नोव्हेंबर या दोन दिवसांच्या कालावधीत या भटक्या कुत्र्यांनी 25 जणांवर हल्ला करुन त्यांना जखमी केले आहे.

पेणमध्ये श्वानदंश झालेल्या रुग्णांमध्ये मयूर कृष्णा दांडेकर, रमेश विठ्ठल पवार, विष्णू नारायण भामरे, मोहम्मद आरिफ शेख, सोमनाथ बाळू मालुसरे, रत्नाकर धावजी म्हात्रे, कमलाबाई सदाशिव मोकल, युवराज प्रवीण गावंड, मनोज पंकज बहेरा, कमलाकर धाया पाटील, संभाजी रामचंद्र ठाकूर, मंजू विठ्ठल राठोड, लक्ष्मण गणेश मोकल, संजय जितेंद्र म्हात्रे, प्राप्ती चंद्रकांत म्हात्रे, प्रेम मच्छीन्द्र कांबळे, विजय प्रजापती, निलेश कोळी, दिनेश साळुंखे, नियाज किरकिरे, आशा पवार, प्रसाद पाटील, साहिल बाबू जाधव, मोहित पाटील, कुमोदिनी घनश्याम पाटील, काळूबाई पोशा पाटील यांचा समावेश आहे. पेण शहरातील चिंचपाडा, कोळीवाडा, बस स्टँड मागील परिसर, या आदी परिसरात प्रमाणात श्वान दंश झाले आहेत. या श्वानदंश झालेल्यांना पेण उपजिल्हा रुग्णालयात उपचार करुन घरी सोडण्यात आले आहे. पेण नगरपालिकेने भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी जनतेतून होत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details