रायगड - जिल्ह्यात कोरोना संकटाशी लढा देणाऱ्या जिल्हा प्रशासनाच्या मदतीस उरण येथील इंडियन ऑइलटँकिंग कंपनीने हातभार लावत दहा लाख रुपयांचा धनादेश जिल्हाधिकारी निधी चौधरी यांना दिला. कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कार्यालयात भेट देऊन ही मदत सुपर्त केली. यापूर्वी कोरोनाची टाळेबंदी जाहीर झाल्यावर कंपनीने उरण तालुक्यातील आपल्या टर्मिनलजवळील गावांमध्ये सुमारे चार टन अन्नधान्य, दोन हजार मास्क व 750 लि. हँडवॉश साबण अशी सामग्री दिली आहे.
जिल्हा आपत्ती व्यवस्थापनास दहा लाख रुपयांची मदत
कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कार्यालयात भेट देऊन ही मदत सुपर्त केली. यापूर्वी कोरोनाची टाळेबंदी जाहीर झाल्यावर कंपनीने उरण तालुक्यातील आपल्या टर्मिनलजवळील गावांमध्ये सुमारे चार टन अन्नधान्य, दोन हजार मास्क व 750 लि. हँडवॉश साबण अशी सामग्री दिली आहे.
जिल्हा आपत्ती व्यवस्थापनास दहा लाख रुपयांची मदत
कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी आपल्या वेतनातून सुमारे पाच लाख रुपयांचा स्वेच्छानिधी उभारून कोव्हिड मदत फंडास सुपुर्त केला आहे. अशा तऱ्हेने सुमारे वीस लाख रुपयांच्या सहाय्यातून सामाजिक बांधिलकी कोव्हिड संकटात जपत कोव्हिड लढ्यात कंपनी प्रशासनाबरोबर आहे. इंडियन ऑइलटँकिंगकडून श्री. अतुल खराटे (निर्देशक, ऑपरेशन्स) व श्री. नवीन चंद्रा (निर्देशक, मनुष्यबळ) यांनी जिल्हाधिकाऱ्यांना कोरोनाकाळात व गेल्या आर्थिक वर्षात राबवलेल्या योजनांची माहिती यावेळी दिली.