महाराष्ट्र

maharashtra

खोपोलीतील बोरघाटात टेम्पो अपघात; चालक जखमी

पुणे शहरातील भोसरी येथील महादेव हक्के हे टेम्पो (क्र.एमएच १२ केपी ०८१२) घेऊन जुन्या पुणे मुंबई महामार्गाने मुंबईकडे जात होते. त्यांचा टेम्पो बोरघाटा आला असता, टेम्पोवरील ताबा सुटल्याने अपघात झाला.

By

Published : Jun 13, 2021, 12:43 PM IST

Published : Jun 13, 2021, 12:43 PM IST

खोपोलीतील बोरघाटात टेम्पो अपघात
खोपोलीतील बोरघाटात टेम्पो अपघात

रायगड - खोपोली बोरघाटात आज(रविवारी) सकाळच्या सुमारास टेम्पोचा अपघात झाला. चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने हा अपघात झाला. या अपघातामध्ये चालक आणि क्लिनर जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी खोपोलीत रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

खोपोलीतील बोरघाटात टेम्पो अपघात; चालक जखमी

पुणे शहरातील भोसरी येथील महादेव हक्के हे टेम्पो (क्र.एमएच १२ केपी ०८१२) घेऊन जुन्या पुणे मुंबई महामार्गाने मुंबईकडे जात होते. त्यांचा टेम्पो बोरघाटा आला असता, टेम्पोवरील ताबा सुटल्याने अपघात झाला. या अपघातामधून क्लिनर सुखरूप बाहेर पडला. मात्र, चालक हक्के टेम्पोतच अडकले. त्यानंतर या घटनेची माहिती मिळताच आयआरबी पेट्रोलिंग टीम, देवदूत यंत्रणा, बोरघाट पोलीस यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर त्यांनी तत्काळ बचावकार्य सुरू करून चालक हक्के यांना टेम्पोच्या बाहेर काढले. त्यानंतर त्यांना तातडीने खोपोली येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details