महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अज्ञात वाहनाच्या धडकेत टेम्पो चालक जखमी - रायगड अपघात बातमी

आयशर टेम्पो पुण्याहून मुंबईकडे माल घेऊन जात असतांना चालकाचा ताबा सुटल्याने अज्ञात वाहनाला जाऊन धडकला. या अपघातात टेम्पो चालकाचे नुकसान झाले आहे.

अज्ञात वाहनाच्या धडकेत टेम्पो चालक जखमी
अज्ञात वाहनाच्या धडकेत टेम्पो चालक जखमी

By

Published : Jun 18, 2021, 1:44 PM IST

रायगड- मुंबई-पुणे एक्सप्रेस रोडवर सतत अपघात होत असतात. आज पहाटे एक्सप्रेस वेवर ढेकू गावाजवळ एका आयशर टेम्पोने समोरील अज्ञात वाहनाला जोरदार धडक देऊन भीषण अपघात झाला. या अपघातात एक जण गंभीर जखमी झाला आहे. जखमीवर एमजीएम रुग्णालयात उपचार चालु आहेत.

एक जण गंभीर

पुण्याहून मुंबईकडे माल घेऊन आयशर टेम्पो जात होता. दरम्यान एक्सप्रेस रोडवरील ढेकू गावाजवळ चालकाचे टेम्पोवरील नियंत्रण सुटल्याने त्याने समोरील अज्ञात वाहनाला जोरदार धडक दिली. यात टेम्पोत चालक अडकला असून, टेम्पोचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या घटनेची माहिती बोरघाट महामार्ग पोलीस व अपघात रेस्क्यू टीमच्या सदस्यांना मिळताच ते तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी अडकलेल्या चालकाला बाहेर काढुन, त्याला पुढील उपचारासाठी एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

हेही वाचा -रोहा-मुरुड रस्त्यावर कोसळली दरड, काही काळ वाहतूक ठप्प

ABOUT THE AUTHOR

...view details