रायगड -कोरोनाच्या लढाईत प्रशासन सर्वस्व झोकून काम करत आहे. वैद्यकीय यंत्रणेबरोबर पोलीस प्रशासनही दिवसरात्र करडी नजर ठेवून काम करत आहेत. कोरोनाला वेशिवरच रोखण्याचे काम हे पोलीस दलातील जवान करत आहेत. रोज अनेक नागरिकांशी येणाऱ्या संपर्कामुळे या कोरोना विषाणूचा जास्त धोका हा पोलिसांना आहे. त्यामुळे पोलिसांच्या आरोग्याच्या दृष्टीने जिल्हा पोलीस अधिक्षक अनिल पारस्कर यांनी अधिकारी, कर्मचारी आणि त्याच्या कुटुंबियांसाठी टेलिमेडिसिन आणि समुपदेशन सुविधा जिल्ह्यात राबवली आहे.
टेलिमेडिसिन समुपदेशन सुविधा कार्यन्वित; रायगड पोलिसांसाठी अधिक्षकांनी सुरू केली योजना - आरोग्य तपासणी
रोज अनेक नागरिकांशी येणाऱ्या संपर्कामुळे या कोरोना विषाणूचा जास्त धोका हा पोलिसांना आहे. त्यामुळे पोलिसांच्या आरोग्याच्या दृष्टीने जिल्हा पोलीस अधिक्षक अनिल पारस्कर यांनी अधिकारी, कर्मचारी आणि त्याच्या कुटुंबियांसाठी टेलिमेडिसिन आणि समुपदेशन सुविधा जिल्ह्यात राबवली आहे.
टेलिमेडिसिन समुपदेशन ही आजच्या काळातील लोकप्रिय सुविधा आहे. ज्याद्वारे रुग्णांना कॉल अथवा व्हिडिओ कॉलींगद्वारे डॉक्टरांशी थेट संवाद साधता येतो. एफआयजीएमडी प्रायव्हेट लिमिटेड ही अमेरिकेतील एक अग्रणी संस्था आहे, जी रुग्णांना मोबाईल अॅपद्वारे अथवा हेल्पलाईन क्रमांकाद्वारे टेलिमेडिसिन समुपदेशन सुविधा पुरवते. यात अमेरिकेतील तब्बल 60 टक्के डॉक्टर्स जोडले गेले आहेत. भारतातही त्यांच्यामार्फत तशी सुविधा सुरु करण्यात आली आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर रायगड पोलीस दलातील अधिकारी, कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांच्या आरोग्याच्या सुरक्षिततेकरिता विनामूल्य टेलिमेडिसिन समुपदेशन सुविधा 24 तास उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
या सुविधेअंतर्गत आरोग्य तपासणीसाठी हेल्पलाईन क्रमांकावर मिस कॉल दिल्यानंतर 45 मिनिटांच्या आत एका समन्वयकाद्वारे संपर्क साधला जातो. ज्यात आपल्या सोयीनुसार तपासणीची वेळ ठरवण्यात येते. तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली ठरलेल्या वेळेनुसार संबंधित आजारावर व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे समुपदेशन केले जाते. आपल्या समस्येचे निराकरण करुन आवश्यकतेप्रमाणे डॉक्टरांकडून प्रिस्कीप्शन मिळते. जर रुग्णाला प्रत्यक्ष वैद्यकीय मदत किंवा प्रत्यक्ष तपासणी करणे आवश्यक असेल तर रुग्णाला जवळच्या रुग्णालयाला भेट देण्यास सुचवले जाते.