रायगड- जिल्ह्यात संचारबंदी लागू असताना पनवेल तालुक्यातील न्हावा गावातील रुचा लखन सिंग या गरोदर मातेस प्रसूती वेदना सुरू झाल्या. यावेळी गावातील अंगणवाडी सेविका सुनीता भोईर यांनी तत्परता दाखवून ग्रामपंचायतीच्या माध्यमातून रुचाला गव्हाण प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. रुचा सिंग यांची प्रसूती नॉर्मल झाली असून त्यांनी एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे.
अंगणवाडी सेविकेच्या कार्यतत्परतेमुळे गरोदर मातेस त्वरित मिळाली वैद्यकीय सेवा - teacher and aasha worker help a pregnant women during curfew
जिल्ह्यात संचारबंदी लागू असताना पनवेल तालुक्यातील न्हावा गावातील रुचा लखन सिंग या गरोदर मातेस प्रसूती वेदना सुरू झाल्या. यावेळी गावातील अंगणवाडी सेविका सुनीता भोईर यांनी तत्परता दाखवून ग्रामपंचायतीच्या माध्यमातून रुचाला गव्हाण प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले.
![अंगणवाडी सेविकेच्या कार्यतत्परतेमुळे गरोदर मातेस त्वरित मिळाली वैद्यकीय सेवा अंगणवाडी सेविकेच्या कार्यतत्परतेमुळे गरोदर मातेस त्वरित मिळाली वैद्यकीय सेवा](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-6606797-541-6606797-1585643982843.jpg)
आशा वर्कर आणि अंगणवाडी सेविका यांच्या तत्परतेमुळे त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. पनवेलच्या न्हावा गावातील रुचा सिंग या गरोदर असून त्यांची प्रसूतीची वेळ जवळ आल्याने त्यांना कळा सुरू झाल्या. त्यावेळी गावातील अंगणवाडी सेविका सुनीता भोईर या गृहभेट देण्यास निघाल्या होत्या. सिंग यांच्या नातेवाईकांनी भोईर यांना परिस्थितीची माहिती दिली. सुनीता भोईर यांनी तात्काळ न्हावा ग्रामपंचायत सरपंच यांना फोन करून रुग्णवाहिकेची व्यवस्था करण्यास सांगितले. सरपंच यांनीही तात्काळ रुग्णवाहिकेची व्यवस्था करून दिली. अंगणवाडी सेविका सुनीता भोईर आणि आशा वर्कर संगीत भोईर यांनी रुचा सिंग यांना गव्हाण प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले.
प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ. अस्मिता बोंबाटकर यांनी रुचा सिंग यांची तपासणी केली. त्यानंतर सिंग यांची प्रसूती नॉर्मल होऊन त्यांनी एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे. बाळ आणि माता दोघेही सुखरूप आहेत.
TAGGED:
aasha worker