महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

रायगडमध्ये माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सुरेश टोकरेंची राष्ट्रवादीत घरवापसी - दत्ताजीराव मसूरकर

राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत शिवसेनेत दाखल झालेले माजी जिल्हापरिषद अध्यक्ष सुरेश टोकरे यांनी आज शिवसेनेला जय महाराष्ट्र करीत पुन्हा राष्ट्रवादीमधे घरवापसी केली आहे.

रायगडमध्ये माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सुरेश टोकरेंची राष्ट्रवादीत घरवापसी

By

Published : Oct 9, 2019, 9:42 PM IST

रायगड- राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत शिवसेनेत दाखल झालेले माजी जिल्हापरिषद अध्यक्ष सुरेश टोकरे यांनी आज शिवसेनेला जय महाराष्ट्र करीत पुन्हा राष्ट्रवादीमधे प्रवेश केला. त्यामुळे अनेक कारणाने बॅकफुटवर असणारे आघाडीचे उमेदवार आमदार सुरेश लाड फ्रंटफुटवर आल्याचे बोलले जात आहे.

हेही वाचा-नोबेल २०१९ : जॉन बी. गुडइनफ एम. स्टॅनली व्हिटिंगहम अन् अकिरो योशिनो ठरले रसायनशास्त्रातील नोबेलचे पारितोषिक विजेते!

शिवसेना जिल्हा सल्लागार हनुमंत पिंगळे यांनी केलेला राष्ट्रवादी प्रवेश, नाराज जिल्हाध्यक्ष दत्ताजीराव मसूरकर प्रचारात सक्रिय आणि आज माजी जिल्हापरिषद अध्यक्ष सुरेश टोकरे यांची घरवापसी ही तीन प्रमुख कारणे त्यामागे असल्याचे बोलले जात आहे. रायगड जिल्ह्यातील कर्जत मतदार संघाचे राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार सुरेश लाड शिवसेनेत जाऊन विधानसभा लढवणार अशा चर्चा उमेदवारी अर्ज भरण्याच्या काही दिवस अगोदर कर्जतमधे ऐकायला मिळत होत्या. त्यादरम्यान त्यांनी राष्ट्रवादीकडून उमेदवारी नाकारली असल्याने कर्जत मधील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते संभ्रमात होते. खासदार सुनिल तटकरे यांनी मनधरनी करीत सुरेश लाड यांना निवडणूक लढवण्यास तयार केले. मात्र, राष्ट्रवादीचे रायगड जिल्हाध्यक्ष दत्ताजीराव मसूरकर यांचा सुरेश लाड यांना विरोध असल्याचे समोर आले होते. मसूरकर राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देणार, अशा बातम्या माध्यमात येत होत्या. त्यामुळे पुन्हा कर्जतची उमेदवारी घेतलेले विद्यमान आमदार यांच्या अडचणीत वाढ झाल्याचे चित्र निर्माण झाले होते.

हेही वाचा-ज्येष्ठ रंगकर्मी अरुण काकडे यांचे दीर्घ आजाराने निधन

शिवसेनेचे नाराज जिल्हा सल्लागार हनुमंत पिंगळे यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करीत खासदार सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीमधे प्रवेश केला. सुरेश लाड यांना निवडून आणणारच, असा विडा उचलित त्यांनी काम सुरू केले. उमेदवारी जाहीर झाल्यापासून दोन हात लांब असलेले राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष मसूरकर काल लाड यांच्या बाजूने प्रचारात उतरले. आज शिवसेनेत गेलेले रायगड जिल्हापरिषदचे माजी अध्यक्ष सुरेश टोकरे यांनी घरवापसी करीत राष्ट्रवादीमधे प्रवेश केल्याने सुरेश लाड यांचे पारडे जड झाल्याचे बोलले जात आहे. शिवसेनेत आमदारकीचे तिकीट महेंद्र थोरवे यांना मिळाल्याने नाराज झालेले जिल्हा सल्लागार हनुमंत पिंगळे व माजी जिल्हापरिषद अध्यक्ष सुरेश टोकरे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला. त्यामुळे राजकीय विश्लेषकांच्या मते अनेक कारणाने बॅकफुटला पडलेले उमेदवार आमदार सुरेश लाड यांच्याकडे एक ताकद निर्माण झाली आहे. मात्र, काल जिल्हाध्यक्ष दत्ताजीराव मसूरकर यांच्या सक्रिय होण्याने सुरेश लाड हे कर्जतमधे पुन्हा त्याच जोमाने फ्रंटफुट वर आल्याचे बोलले जात असून ही लढत मोठी चुराशिची होणार हे नक्की.

ABOUT THE AUTHOR

...view details