महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कोणाच्या जाण्याने काही फरक पडत नाही; अवधूतला शुभेच्छा - सुनील तटकरे - रायगड

श्रीवर्धन मतदार संघाचे आमदार अवधूत तटकरे, माजी आमदार अनिल तटकरे यांनी आज मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबांधन बांधून भगवा झेंडा हातात घेतला.

सुनील तटकरे

By

Published : Sep 9, 2019, 10:24 PM IST

रायगड- अवधूत याने घेतलेला निर्णय हा त्याचा त्याने घेतला आहे. ही कौटुंबिक बाब असुन त्यावर मी जास्त काही बोलू शकत नाही. पण कोणाच्या जाण्याने पक्षाला हानी पोहचणार नाही. अवधूत याने शिवसेनेत प्रवेश केला असून माझ्या त्याला शुभेच्छा आहेत, अशी प्रतिक्रिया खासदार सुनील तटकरे यांनी अवधूत तटकरे यांच्या शिवसेना पक्ष प्रवेशाबाबत दिली आहे.

खासदार सुनील तटकरे

हेही वाचा - आयारामांमुळे सत्ताधारी पक्षातील अनेकजण आमच्या संपर्कात - वडेट्टीवार

श्रीवर्धन मतदारसंघाचे आमदार अवधूत तटकरे, माजी आमदार अनिल तटकरे यांनी आज मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबांधन बांधून भगवा झेंडा हातात घेत पक्ष प्रवेश केला. यावेळी महाडचे आमदार भरत गोगावले, जिल्हाप्रमुख अनिल नवगणे, उद्योगमंत्री सुभाष देसाई, प्रमोद घोसाळकर उपस्थित होते.

हेही वाचा - भिडेंनी तोडले अकलेचे तारे.. म्हणे एकादशीला अवकाशात यान सोडल्याने अमेरिका झाली यशस्वी

अवधूत तटकरे यांनी शिवसेनेत जाण्याचा निर्णय त्यांनी स्वतः घेतला आहे. तसेच ही बाब कौटुंबिक असल्याने यावर मी जास्त भाष्य करणार नाही. श्रीवर्धन व कर्जत खालापूर हे मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहेत. तसेच आघाडीतर्फे 5 मतदारसंघात आमची आघाडी मजबूत आहे. त्यामुळे कोणाच्या जाण्याने कोणताही परिणाम होणार नाही, असे सुनिल तटकरे यांनी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details