रायगड- आधी कोकणची तहान भागून झाल्यानंतर उर्वरित पाणी किती आहे, याची माहिती शास्त्रोक्त पद्धतीने कोकणवासीयांना द्या. त्यानंतर मराठवाड्याला पाणी द्यायचे की नाही हा निर्णय घेतला जाईल. आमची तहान अर्धी ठेऊन पाणी फिरवले जात असेल तर आमचा विरोध आहे, अशी स्पष्ट भूमिका खासदार सुनील तटकरे यांनी मांडली आहे. त्यामुळे भविष्यात पाणी प्रश्न चिखळण्याची शक्यता आहे.
अलिबाग येथे पत्रकार परिषदेत बोलताना खासदार सुनील तटकरे अलिबाग येथे दिशा बैठकीसाठी आले असता सुनील तटकरे यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांना नदी जोड प्रकल्पाबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर दिले.
हेही वाचा - अखेर नारायण राणेंचा भाजप प्रवेश ठरला; 1 सप्टेंबरला महाराष्ट्र स्वाभिमान पक्षासह भाजपात
मराठवाडा, विदर्भातील जिल्ह्यात पाण्याचे प्रचंड हाल आहेत. त्यामुळे दरवर्षी याठिकाणी दुष्काळ सदृश्य परिस्थिती असते. कोकणात पाऊस मोठ्या प्रमाणात असून पाण्याचा साठा मुबलक आहे. हा विचार करून राज्य शासनाने कोकणातील पाणी नदी जोड प्रकल्पातून मराठवाड्यात नेण्याची योजना आखली आहे. या नदी जोड प्रकल्पाला कोकणवासीयांचा विरोध आहे. मराठवाड्यात कोकणातून पाणी नेत असल्याबाबत सुनील तटकरे यांना प्रश्न विचारला असता त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.
हेही वाचा - पहारेकऱ्याची भूमिका चोख बजावल्याने भाजपने घेतला अभिजित सामंत यांचा राजीनामा