रायगड - लोकसभा निवडणुकीत यावेळी विविध संघटनांनी तसेच मतदारांनी मला पूर्ण पाठिंबा दिला आहे. सहा वेळा खासदार म्हणून निवडून आलेल्या निष्क्रिय खासदारांना घरी बसवून मला संसदेत पाठवा, अशी प्रतिक्रिया आघाडीचे उमेदवार सुनील तटकरे यांनी दिली.
सहा टर्मची निष्क्रियता संपवून मला संसदेत पाठवा - सुनील तटकरे - election
दुरशेत येथे असलेल्या मतदान केंद्रावर आघाडीचे उमेदवार सुनील तटकरे हे आपल्या कुटूंबासह मतदान करायला आले होते. यावेळी पत्नी वरदा तटकरे, आई गीता तटकरे, पुत्र आ. अनिकेत तटकरे, सून वेदांती तटकरे यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला.
दुरशेत येथे असलेल्या मतदान केंद्रावर आघाडीचे उमेदवार सुनील तटकरे हे आपल्या कुटूंबासह मतदान करायला आले होते. यावेळी पत्नी वरदा तटकरे, आई गीता तटकरे, पुत्र आ. अनिकेत तटकरे, सून वेदांती तटकरे यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. यावेळी तटकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
यावेळी तटकरे म्हणाले की, विविध संघटनांनी मला पाठिंबा दिला आहे. त्याचबरोबर शेकाप, काँग्रेस पक्षानेही पूर्ण ताकदीने स्वतः उमेदवार समजून निवडणुकीत काम केले आहे. गेल्या निवडणुकीत निसटता पराभव झाला असला तरी यावेळी मोठ्या मताधिक्याने निवडून येईल, असा विश्वास तटकरे यांनी बोलून दाखवला.