महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सुनील तटकरे यांच्‍या जीवाला धोका; निनावी पत्रामुळे कार्यकर्ते आक्रमक - बाळासाहेब सातपुते

राष्‍ट्रवादी काँग्रेसचे राष्‍ट्रीय सरचिटणीस सुनील तटकरे यांच्‍या जीवाला धोका असल्‍याचे पत्र म्‍हसळ्यातील राष्ट्रवादीच्या कार्यालयाला मिळाले आहे. यासंदर्भात राष्‍ट्रवादी काँग्रेसचे म्‍हसळा तालुका अध्‍यक्ष समीर बनकर यांनी म्‍हसळा पोलीस ठाण्‍यात तक्रार नोंदवली आहे.

निनावी पत्र

By

Published : Mar 22, 2019, 7:51 PM IST

रायगड - राष्‍ट्रवादी काँग्रेसचे राष्‍ट्रीय सरचिटणीस सुनील तटकरे यांच्‍या जीवाला धोका असल्‍याचे पत्र म्‍हसळ्यातील पक्षाच्या कार्यालयाला मिळाले आहे.

या पत्रात बाळासाहेब भाऊसाहेब सातपुते या अहमदनगर जिल्‍ह्यातील वडगाव तांदळी येथे राहणाऱ्या व्‍यक्‍तीपासून तटकरे यांना धोका असल्‍याचे म्‍हटले आहे. ही व्‍यक्‍ती गुन्हेगारी प्रवृत्‍तीची आहे. तटकरेंना ठार मारण्‍यासाठी पूर्व वैमनस्‍यातून काही लोकांनी या व्‍यक्‍तीची मदत घेतली असल्‍याचेही या पत्रात नमूद करण्‍यात आले आहे.

यासंदर्भात राष्‍ट्रवादी काँग्रेसचे म्‍हसळा तालुका अध्‍यक्ष समीर बनकर यांनी म्‍हसळा पोलीस ठाण्‍यात तक्रार दिली आहे. पोलिसांनी या घटनेबाबत अदखलपात्र गुन्‍हा नोंदवला आहे. तर दुसरीकडे या व्‍यक्‍तीचा शोध घेण्‍यासाठी रायगड पोलिसांचे पथक नगरकडे रवाना झाले आहे. तटकरे यांना आलेल्या या धमकी पत्रामुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये संतापाचे वातावरण पसरले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details