रायगड - राष्ट्रीय आपत्ती निवारण निधी हा केंद्राचा आहे, असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर म्हणतात हे बरोबर आहे. मात्र गेल्यावर्षी झालेल्या अतिवृष्टीत भाजप सरकारने दिलेली मदत ही कमी होती. आता महाविकास आघाडी सरकारने भाजप सरकारच्या तुलनेत तीनपट निधी नुकसानग्रस्तांना दिला आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर यांनी राष्ट्रीय आपत्ती निवारण निधीचे निकष कोकणासाठी बदलावे, असा सणसणीत टोला खासदार सुनील तटकरे यांनी दोन्ही विरोधी पक्षनेत्यांना लगावला आहे. तसेच आसाम आणि बंगालमध्ये झालेले नुकसानीच्या तुलनेत कोकणात झालेले नुकसान कमी असल्याच्या दरेकर याच्या व्यक्तव्यावरही तटकरे यांनी पत्रकार परिषदेत चांगलेच ताशेरे ओढले.
चार दिवसांपूर्वी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी खासदार सुनील तटकरे आणि पालकमंत्री यांच्यावर टीका केली होती. तसेच नुकसान भरपाई वाटपात राजकीय नेत्यांनी आपल्या लोकांना भरपाई दिली गेली असल्याचा आरोप दरेकर यांनी केला होता. तर केंद्राकडून एनडीआरएफचा निधी हा केंद्राचाच असल्याचेही म्हटले होते.
अलिबाग येथे राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत प्रवीण दरेकर यांच्या या आरोपाबाबत खासदार सुनील तटकरे याना प्रश्न विचारला असता, एनडीआरएफचा निधी हा केंद्राचाच असतो. एनडीआरएफ निधीचा निकष हा देशभर एकच असतो. मात्र बंगाल आणि आसाम याठिकाणी पूरस्थितीवेळी केंद्राने निकष बदलून निधी दिला. केंद्राचा एनडीआरएफचा येईलही मात्र तो येईपर्यत राज्य सरकार गप्प बसले नाही. राज्य सरकारने नुकसानग्रस्त भागात तातडीने निधी पाठवून दिला. तसेच भाजप सरकार काळात मिळत असलेल्या नुकसान भरपाई पेक्षा तिप्पट प्रमाणात मदत शासनाने जाहीर केली आहे, असे उत्तर सुनील तटकरे यांनी दिले.
खासदार सुनील तटकरे यांचा विरोधी पक्षनेत्यांना टोला, म्हणाले... - sunil tatkare on nisarg cyclone
अलिबाग येथे राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत प्रवीण दरेकर यांच्या या आरोपाबाबत खासदार सुनील तटकरे याना प्रश्न विचारला असता, एनडीआरएफचा निधी हा केंद्राचाच असतो. एनडीआरएफ निधीचा निकष हा देशभर एकच असतो. मात्र बंगाल आणि आसाम याठिकाणी पूरस्थितीवेळी केंद्राने निकष बदलून निधी दिला. केंद्राचा एनडीआरएफचा येईलही मात्र तो येईपर्यत राज्य सरकार गप्प बसले नाही. राज्य सरकारने नुकसानग्रस्त भागात तातडीने निधी पाठवून दिला. तसेच भाजप सरकार काळात मिळत असलेल्या नुकसान भरपाई पेक्षा तिप्पट प्रमाणात मदत शासनाने जाहीर केली आहे, असे उत्तर सुनील तटकरे यांनी दिले.
खासदार सुनील तटकरे यांचा विरोधी पक्षनेत्यांना टोला, म्हणाले...