रायगड- वंचित बहुजन आघाडीच्या रायगड लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार सुमन कोळी यांनी आज (मंगळवारी) आपला उमेदवारी अर्ज जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांच्याकडे सादर केला. १९९९ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने महिला उमेदवार म्हणून पहिल्यांदा श्रीमती पुष्पा साबळे यांना कुलाबा मतदारसंघाची उमेदवारी दिली होती. त्यानंतर दुसऱ्यांदा रायगड लोकसभा निवडणुकीत महिला उमेदवार म्हणून वंचित बहुजन आघाडीच्या सुमन कोळी यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
रायगडमधून वंचित बहुजन आघाडीच्या सुमन कोळींचा उमेदवारी अर्ज दाखल - Lok Sabha seat
वंचित बहुजन आघाडीच्या रायगड लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार सुमन कोळी यांनी आज (मंगळवारी) आपला उमेदवारी अर्ज जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांच्याकडे सादर केला.
वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार सुमन कोळी यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला प्रथम हार अर्पण केला. त्यानंतर बहुजन वंचित आघाडीतर्फे घोषणा देत रॅली काढली. यावेळी भारिप व एमआयएमचे झेंडे हातात घेऊन कार्यकर्ते रॅलीत सहभागी झाले होते.
वंचित बहुजन आघाडीतर्फे पहिल्यांदाच रायगड लोकसभा मतदार संघात महिलेच्या रूपाने उमेदवार उभा करण्यात आला आहे. त्यामुळे आघाडीला जिल्ह्यातील मतदार किती जवळ करतात हे २५ मे ला मतमोजणीच्या दिवशी कळणार आहे. बहुजन व मुस्लीम समाजाची मते वंचित बहुजन आघाडीकडे काही प्रमाणात वळतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे युती व आघाडीला याचा तोटा होणार, हे नक्की.