रायगड : मुंबई-गोवा महामार्गावर महाड शहरानजीक असणार्या केंबुर्ली गावाच्या वळणावर सावित्री नदी पात्रालगत काही अज्ञात व्यक्तींनी सल्फर सदृश्य रसायन टाकले होते. या रसायनाला अचानक आग लागल्याने धुराचे लोट सर्वत्र पसरले आहेत. आगीमुळे महामार्गावर काही काळ वाहतुकीला अडथळा निर्माण झाला होता. महाड औद्योगिक क्षेत्रातील अग्निशमन दलाने ही आग विझविण्यात यश मिळविले.
मुंबई-गोवा महामार्गावर सल्फर सदृश्य रसायनला लागली आग
मुंबई-गोवा महामार्गावर महाड शहरानजीक असणार्या केंबुर्ली गावाच्या वळणावर सावित्री नदी पात्रालगत काही अज्ञात व्यक्तींनी सल्फर सदृश्य रसायन टाकले होते. या रसायनाला अचानक आग लागल्याने धुराचे लोट सर्वत्र पसरले आहेत. आगीमुळे महामार्गावर काही काळ वाहतुकीला अडथळा निर्माण झाला होता. महाड औद्योगिक क्षेत्रातील अग्निशमन दलाने ही आग विझविण्यात यश मिळविले.
याप्रकरणी सामाजिक कार्यकर्ते फैजल चादले यांनी या घटनेबाबत प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे तक्रार दाखल केली आहे. संबंधितांविरोधात कडक कारवाई करण्याची मागणी चादले यांनी केली आहे. सावित्री नदीपात्रात जाणार्या रसायनयुक्त मिश्रणामुळे जनतेच्या आरोग्यास धोका निर्माण होण्याची भितीही त्यांनी व्यक्त केली.
घटनास्थळी उपस्थित असलेल्या ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी या ठिकाणी एक ट्रक पलटी झाला होता. त्यामधून हे सल्फर सदृश्य रसायन पडले असावे, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.