रायगड- मुलाने आपल्या सावत्र आईवर चाकू हल्ला करत ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. ही घटना कर्जत तालुक्यातील डिकसल येथे घडली आहे. जखमी महिलेला उपचारासाठी पनवेल कळबोली येथील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी नेरळ पोलिसांनी हल्लेखोर मुलाला ताब्यात घेतले आहे.
मिळालेल्या माहिती नुसार, 10 मार्चला डिकसल येथील पाली वसाहत असलेल्या समृद्धी हिल व्ही सोसायटी येथे राहणाऱ्या लीला विनोद जयस्वाल (वय 35 वर्षे) या आपल्या खोलीत बसल्या होत्या. त्यावेळी त्यांचा सावत्र मुलगा अभिषेक जयस्वाल याने कुटुंबातील वादामुळे आपल्या सावत्र आईवर धारदार शस्स्त्राने सहा वार केले होते. घटनेच्या दिवसापासून आरोपी मुलगा अभिषेक फरार झाला होता.