रायगड - अल्पवयीन गतीमंद मुलीवर अतिप्रसंग झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही घटना रोह्यात घडली आहे. आरोपी करीम नागोठकर असे नराधमाचे नाव आहे. नागरिकांच्या प्रक्षोभानंतर 8 दिवसांनी त्याच्यावर रोहा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला अटक करण्यात आली असून या प्रकरणाचा तपास महिला अधिकाऱ्याकडे सोपवण्यात आला आहे.
पेण येथून पोटापाण्यासाठी अष्टमी गावात आलेल्या सामान्य कुटुंबावर मोठे संकट कोसळले. त्यांच्या गतीमंद लहानग्या मुलीवर मागील आठवडयाच्या शुक्रवारी 28 मार्च रोजी दुपारी अतिप्रसंग ओढावला. निर्जन भागात संबधीत मुलीला बोलावून गावातील प्रौढ व्यक्ती करीम नागोठकर याने तिच्याशी अश्लिल चाळे केल्याची गंभीर घटना घडली आहे. हे सर्व धक्कादायक प्रकरण लक्षात येताच आई-वडिलांनी पोलिसांकडे धाव घेतली. सर्व प्रकरण विस्तृत केले. मात्र संबधीत पोलिसांनी कुटुंबाची तक्रार गांभीर्याने घेतली नाही.
हेही वाचा -अहो आश्चर्यम..! समृद्धी महामार्गात चक्क जमीन गेली चोरीला, शेतकऱ्याची इच्छामरणाची मागणी
पीडितेच्या कुटुंबियांनी तक्रार दाखल करू नयेत असेही प्रयत्न झाले. मुलीच्या आई कडून हवे तसे पत्र लिहून घेतले गेले. मुलीची वैद्यकीय तपासणीही सरकारी रुग्णालयात न करता खाजगी दवाखन्यात केली गेली. मुलीला खूप वेदना होत असल्याचे तिची आई व्याकूळ होऊन सांगत असतानाही पोलिसांनी या प्रकरणाकडे दुर्लक्ष केले. पीडित मुलीच्या कुटुंबियांनी गाव सोडून जावे असे त्यांना धमकावण्यात आले. पीडित मुलीचे कुटुंबीय स्थानिक नसल्यामुळे त्यांना धमकावण्यात येत असल्याने शुक्रवारी मुलीच्या आईने स्वतः पोलीस अधिकारी आणि रोहेकर नागरिकांना सांगितले.
मुलगी गतीमंद असल्याने फायदा उठविण्यात आला, खाजगी रूग्णालयातील महिला प्रसुती तज्ञांनीही तपासणी अहवाल पोलिसांना वेळेत दिला नाही. मुळात पोलिसांनीच अहवाल न मागता प्रकरणाकडे दुर्लक्ष केले. अखेर या प्रकरणाला आठवडयानंतर शुक्रवारी वाचा फुटली. रोहा पोलीस ठाण्यात सबंध अष्टमी रोहेकर ग्रामस्थ संतप्त झाले. रोहा अष्टमीत प्रक्षोभ उडाला, शहरातील सर्व पक्षीय नेते, ग्रामस्थ पत्रकार आणि तरुणांनी शुक्रवारी रोहा पोलीस ठाण्यात धाव घेतली. हे प्रकरण सोशल मिडियावर व्हायरल झाल्याने पोलिसांवर दबाव वाढला. पीडित कुटुबांची तक्रार का घेतली गेली नाही असा प्रश्न संबंध रोहेकर विचारू लागले. डाॅ. खैरकर यांनी उशिरा दिलेल्या रिपोर्टमध्येही धक्कादायक उल्लेख आले. याची माहिती मिळताच जिल्हा पोलिस अधिक्षक अनिल पारसकर यांनी दखल घेत प्रकरणाची चौकशी उपविभागीय पोलिस अधिकारी अलिबाग सोनल कदम यांचेकडे दिली. रोहा पोलिसांत आरोपी विरोधात पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला असून आरोपीला ताब्यात घेतले आहे.
हेही वाचा -'फोन-पे' चालेना, अनेक वापरकर्ते चिंतातूर; येस बँकेवरील निर्बंधांचा फटका