रायगड - अलिबाग शहरात सरखेल कान्होजी आंग्रे यांनी दगडी चिरेबंदीने बांधलेला हिराकोट किल्ला आहे. हा आंग्रेंच्या काळातील महसुली केंद्रस्थळ आणि कुलाबा, खांदेरीवर जमिनीवरून आक्रमण झाल्यास या किल्ल्यातून रसद पुरवण्याची सोय होती. हिराकोटमधील छुपी सैन्याची तुकडी शत्रूवर तुटून पडून जेरीस आणत असे. तसेच हिराकोट किल्ला हा कुलाबा आणि खांदेरी यांचा त्रिकोणी संगम आहे. हिराकोट किल्ल्यात सध्या जिल्हा कारागृह असून तेथे आता वस्तुसंग्रहालय करण्याचा मानस राज्य शासनाने केला आहे. हिराकोट किल्ल्याचा इतिहास अनेकांना ज्ञात नाही. कान्होजी आंग्रे याचे नववे वंशज रघुजी राजे आंग्रे यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना या किल्लातील अनेक प्रसंग डोळ्यासमोर उभे केले.
साडेतीनशे वर्षांपासून 'हिराकोट' आजही अभेद्य...रायगडचे तुरुंग असलेल्या किल्ल्याची कहाणी! - कान्होजी आंग्रे
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सुनबाई महाराणी ताराराणी यांनी सरखेल कान्होजी आंग्रे यांना वसईपासून ते कारवारपर्यत भूभाग दिला होता. यावेळी इंग्रज, डच, पोर्तुगीज, सिद्धी यासारखे शत्रू हे मराठ्यांचे साम्राज्य नष्ट करण्यास टपले होते. अशा कठीण परिस्थितीत सरखेल कान्होजी आंग्रे यांनी आपले मुख्य स्थळ हे कुलाबा निवडले. कुलाबा ते तळकोकणापर्यंतचा भूभागावर टेहाळणी करण्यासाठी त्यांनी चिरेबंदी 'हिराकोट' बांधला.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सुनबाई महाराणी ताराराणी यांनी सरखेल कान्होजी आंग्रे यांना वसईपासून ते कारवारपर्यत भूभाग दिला होता. यावेळी इंग्रज, डच, पोर्तुगीज, सिद्धी यासारखे शत्रू हे मराठ्यांचे साम्राज्य नष्ट करण्यास टपले होते. अशा कठीण परिस्थितीत सरखेल कान्होजी आंग्रे यांनी आपले मुख्य स्थळ हे कुलाबा निवडले. तेथून ते वसई ते कारवार पर्यंतचा कारभार पाहू लागले. अलिबाग येथे रेवसपासून ते रेवदंडा, बामणगाव पर्यत आंग्रे याची सत्ता होती. या अष्टगराचा आणि इतर ठिकाणाहून येणारा महसूल गोळा करण्यासाठी आणि शत्रूवर नजर ठेवण्यासाठी एक किल्ला हवा या दृष्टीने हिराकोट किल्ल्याचे बांधकाम 1720 साली करण्यात आले.
हिराकोट किल्ला ही ऐतिहासिक वास्तू असून त्याला मराठ्यांचा मोठा इतिहास असल्याचे रघुजी आंग्रे यांनी सांगितले. ते सरखेल कान्होजी आंग्रे यांचे वंशज आहेत. कोणताही किल्ला तुरुंग असू नये, अशी मागणी त्यांनी केली. किल्ले हे आमचे स्फूर्ती स्थान आहे. अष्टगराचा इतिहास समजायचा असेल आणि प्रदर्शनीय वास्तू करायची असेल तर हिराकोट सारखा किल्ला नाही, असे मत रघुजी आंग्रे यांनी व्यक्त केले आहे.