महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मोबाईल न दिल्याने मुलाने केली वडिलांची हत्या - crime news marathi

वडिलांनी मुलाचा घेतलेला मोबाईल दिला नाही म्हणून रागात मुलाने दारूच्या नशेत बापाची हत्या केली. ही गंभीर घटना तळा तालुक्यातील वरळ या गावात घडली.

मोबाईल न दिल्याने मुलाने केली वडिलांची हत्या
मोबाईल न दिल्याने मुलाने केली वडिलांची हत्या

By

Published : Jan 19, 2021, 6:57 PM IST

रायगड - वडिलांनी मुलाचा घेतलेला मोबाईल दिला नाही म्हणून रागात मुलाने दारूच्या नशेत बापाची हत्या केली. ही गंभीर घटना तळा तालुक्यातील वरळ या गावात घडली. भागूराम काप (55) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. मुलगा भावेश काप (31) याला तळा पोलिसांनी अटक केली आहे. तळा तालुक्याती दीड महिन्यात ही दुसरी हत्येची घटना घडली आहे.

मोबाईल न दिल्याने मुलाने केली वडिलांची हत्या
मोबाईल न दिल्याने वडिलांच्या डोक्यात घातले चोपणे-
तळा तालुक्यातील वरळ या गावात भागूराम काप हे मुलासोबत राहत होते. भावेश हा मुंबईत कामाला होता. लॉकडाऊनमुळे त्याचे काम सुटल्याने तो गावी आला होता. 18 जानेवारी रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास भावेश हा दारूच्या नशेत घरी आला. त्यानंतर स्वतःचा मोबाईल आपल्या वडिलांकडे मागितला. या क्षुल्लक कारणावरून दोघांमध्ये भांडण झाले. दारूच्या नशेत असलेल्या भावेशने रागाच्या भरात घरात जमीन चोपण्याचे चोपणे उचलून वडिलांच्या डोक्यात घातले. त्यामुळे भागूराम यांचा जागीच मृत्यू झाला. आपल्या वडिलांची हत्या करून भावेश याने सकाळपर्यंत कोणालाच सांगितले नाही.

भागूराम याचा मित्र घरी आल्यानंतर कळली घटना-

भागूराम याचा मित्र सकाळी घरी आला असता भावेश याने केलेल्या कृत्याबाबत त्यांना सांगितले. हे ऐकून मित्रही स्तब्ध झाला. त्यानंतर मित्राने पोलीस पाटील यांना घटनेची माहिती दिली. पोलीस पाटील यांनी त्वरित तळा पोलिसांना याबाबत फोनवरून माहिती कळवली. पोलीस घटनास्थळी आल्यानंतर पंचनामा करून भागूराम याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठविला. हत्येप्रकरणी भावेश याला तळा पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्यावर हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. भावेश याचे लग्न झाले असून त्याला दोन मुले आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details