महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

रेवदंडा समुद्रकिनारी भारतीय जवानांनी घेतले शिवकालीन युद्धकलेचे प्रशिक्षण - raigad latest news

रेवदंडा समुद्रकिनारी शिवकालीन कलेचे शिबिर भरविण्यात आले होते. या शिबिरात भारतीय जवानांनी शिवकालीन युद्धकलेचे प्रशिक्षण घेतले.

भारतीय जवान
भारतीय जवान

By

Published : Oct 4, 2020, 7:04 PM IST

रायगड - छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात शस्त्रकला व मल्लखांबाचे प्रशिक्षण मावळ्यांना दिले जात होते. याच शिवकालीन कलेत अलिबाग तालुक्यातील चौल येथील शिरीष नाईक यांनी प्रावीण्य मिळविले असून त्याच्या या कलेची भुरळ भारतीय सैन्यालाही पडली आहे. भारतीय सैन्यातील 5 मराठा बटालियनच्या 11 जवानांनी चौल येथे येऊन शिरीष नाईक यांच्याकडून शिबिरात या शिवकालीन कलेचे प्रशिक्षण घेतले आहे.

मल्लखांबचा सराव करताना भारतीय जवान
चौल येथील शिरीष नाईक यांच्या श्री राम स्पोर्ट्स असोसिएशनमार्फत शिवकालीन शस्त्रकला, मल्लखांबचे प्रशिक्षण अनेक वर्षांपासून दिले जात आहे. या कलेमुळे तरुणाचे शरीर हे काटक आणि चपळ होत असते. या शिबिराला रायगडसह राज्यातील अनेक तरुण सहभागी होत असतात. मात्र, यावेळी घेतलेले शिबीर हे नाईक यांच्यासाठी विशेष ठरले आहे.
दांडपट्ट्याचा सराव करताना
शिवकालीन शस्त्रकला आणि मल्लखांब शिबिर रेवदंडा समुद्रकिनारी आयोजित येथे 20 सप्टेंबर ते 3 ऑक्टोबर, असे 15 दिवसांचे केले होते. या शिबिरात भारतीय सैन्य दलातील 5 मराठा बटालियनच्या 11 जवानांनी या शिबिराला हजेरी लावली होती. यामुळे हे शिबीर विशेष असल्याचे शिरीष नाईक यांनी सांगितले. सहभागी झालेल्या 11 जवानांना दांडपट्टा, मल्लखांब, तलवारबाजी यासारखे मैदानी कसरतीचे प्रशिक्षण देण्यात आले. या शिबिराची सांगता शुक्रवारी (दि. 3 ऑक्टोबर) संध्याकाळी रेवदंडा समुद्र किनारी झाली.शिरीष नाईक यांच्या या कलेमुळे चौलचे नाव देशभरात उंचावले आहे.
तलवारबाजीचा सराव करताना

ABOUT THE AUTHOR

...view details