महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

समाजकल्याण सभापतींचे जिल्हा परिषद प्रशासनाविरोधात आंदोलन - Raigad Zilla Parishad Latest News

समाज कल्याण विभागांतर्गत असलेल्या अपंगकल्याण विभागाला कार्यालय उपलब्ध करून द्यावे, या मागणीसाठी खुद्द रायगड जिल्हा परिषदेचे समाजकल्याण सभापती दिलीप भोईर आक्रमक झाले आहेत. त्यांनी आपले कार्यालय अभ्यागत कक्षात सुरू करून, प्रशासनाचा निषेध केला आहे.

agitation against ZP administration Raigad
समाजकल्याण सभापतींचे आंदोलन

By

Published : Dec 18, 2020, 9:14 PM IST

रायगड - समाज कल्याण विभागांतर्गत असलेल्या अपंगकल्याण विभागाला कार्यालय उपलब्ध करून द्यावे, या मागणीसाठी खुद्द रायगड जिल्हा परिषदेचे समाजकल्याण सभापती दिलीप भोईर आक्रमक झाले आहेत. त्यांनी आपले कार्यालय अभ्यागत कक्षात सुरू करून, प्रशासनाचा निषेध केला आहे. मात्र यामुळे सभापतींनाच मागणी पूर्ण करण्यासाठी आंदोलन करावे लागत असेल तर, सर्वसामान्य नागरिकांना कामे करून घेण्यासाठी काय करावे लागत असेल असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

समाजकल्याण सभापतींचे प्रशासनाविरोधात आंदोलन

समाजकल्याण विभागांतर्गत अपंगकल्याण विभागाचे काम चालते. अपंगकल्याण विभागाची इमारत ही मोडकळीस आली आहे. त्यामुळे या ठिकाणी बसणारे कर्मचारी, अधिकारी आणि कार्यालयात येणारे दिव्यांग व्यक्ती यांना आपला जीव धोक्यात घालून काम करावे लागत आहे. जिल्हा परिषद सर्वसाधारण सभेत तसेच विशेष सभेत अनेकदा जागेबाबत चर्चा करूनही, अद्यापही जिल्हा परिषद प्रशासनाने याकडे कानाडोळा केला असल्याचा आरोप दिलीप भोईर यांनी केला आहे. अखेर सभापती दिलीप भोईर यांनी इमारतीसाठी प्रशासनाविरोधात आंदोलन छेडले आहे.

समाजकल्याण सभापतींचे आंदोलन

अभ्यागत कक्षात थाटले कार्यालय

समाजकल्याण सभापती दिलीप भोईर यांनी जिल्हा परिषद प्रशासनाविरोधात आंदोलन छेडले आहे. आपल्या कक्षात न बसता दिलीप भोईर हे जिल्हा परिषद कार्यालयातील अभ्यागत कक्षात बसून लोकांना भेटत आहेत. तर आपला कक्ष हा दिव्यांग व्यक्तींना बसण्यासाठी खुला करून दिला आहे. त्यांच्या या अनोख्या आंदोलनाने जिल्हा परिषद प्रशासनाचे मात्र धाबे दणाणले आहे.

अपंगकल्याण विभागाच्या इमारतीची दुरवस्था

समाजकल्याण विभागांतर्गत अपंगकल्याण विभागासाठी पाच टक्के निधी असतो. तो निधी अपंग व्यक्तीच्या योजनेवर खर्च केला जातो. अपंग विभाग कार्यालय हे सध्या जुन्या इमारतीत सुरू आहे. मात्र ही इमारत मोडकळीस आली आहे. त्यामुळे येथील कर्मचारी जीव मुठीत धरून काम करत आहेत. लवकरात लवकर अपंगकल्याण विभाग कार्यालयाला जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी सभापती दिलीप भोईर यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ किरण पाटील यांच्याकडे केली आहे. मात्र मागणी मान्य होत नसल्याने सभापतींनी आंदोलन सुरू केले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details