रायगड -लोणावळा - खंडाळा घाटातील निसर्ग सौंदर्य अनेकांना भुरळ पाडते. त्यामुळे, वर्षा सहलीसाठी हजारोच्या संख्येने पर्यटक लोणावळा - खंडाळा घाटात दाखल होतात. दरम्यान कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पर्यटकांना पर्यटनस्थळी येण्यास मज्जाव आहे. परंतु, नियमांची ऐशीतैशी करून नागरिक लोणावळ्यातील पर्यटनस्थळी पोहचत आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लोणावळ्यातील पर्यटनस्थळी १४४ कलम लागू करण्यात आले आहे. पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र येण्यास मज्जाव करण्यात आले आहे. तरी रविवार मोठ्या प्रमाणात पर्यटकांनी गर्दी केल्याने या ठिकाणी सोशन डिस्टन्सचा फज्जा उडाला. या ठिकाणी शासनाच्या नियमांचे उल्लंघन होत असून पुढील काळात कोरोनाचे मोठे संकट उभे राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
शासकीय नियमांचा उडाला फज्जा
गेल्या काही दिवसांपासून लोणावळ्यातील पर्यटनस्थळी नागरिक गर्दी करत असल्याचे निदर्शनास आले होते. त्यामुळे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वारंवार आवाहन करून १४४ कलम लागू केले. वर्षा सहलीसाठी हजारोच्या संख्येने पर्यटक लोणावळा - खंडाळा घाटात दाखल होतात. दरम्यान कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पर्यटकांना पर्यटनस्थळी येण्यास मज्जाव आहे. परंतु, नियमांची ऐशीतैशी करून नागरिक लोणावळ्यातील पर्यटनस्थळी पोहचत आहे.