रायगड -भंगाराच्या दुकानात बेकायदेशीररित्या गांजाची तस्करी करणाऱ्याला रायगडच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने सोमवारी रात्री नागोठणे चिकणी येथून अटक केली. त्याच्याकडून ४ किलो गांजा, २८ चिलीम असा एकूण ४८ हजार ५६० रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.
भंगाराच्या दुकानात गांजा विक्री सुरू
चिकनी येथील एका भंगाराच्या दुकानात मोठ्या प्रमाणात गांजा व अन्य अंमली पदार्थाचा साठा असल्याच माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस हवालदार प्रशांत दबडे यांना १५ फेब्रुवारी रोजी मिळाली. घटनेचे गांभीर्य ओळखून त्याचदिवशी पडताळणी करून पोलीस निरीक्षक दयानंद गावडे यांच्या मार्गदर्शनानुसार सापळा रचण्यात आला. रोहा तालुक्यातील चिकनी येथे रात्रीच्या सुमारास भंगाराच्या दुकानात छापा टाकला असता, पथकाने गांजासह अंमली पदार्थाचा साठा दिसून आला.