रायगड - जिल्ह्यातील महाड येथे 24 ऑगस्टला तारिक गार्डन ही पाच मजली निवासी इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेतील 16 व्यक्तींचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. त्यांच्या कुटुंबीयांना, वारसांना मदत देण्यासाठी कोकण विभागीय आयुक्तांनी 64 लाख रुपये मंजूर केला असून हा निधी वितरण करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. ही मदतीची रक्कम मृत व्यक्तींच्या वारसांच्या बँक खात्यांमध्ये थेट जमा करण्यात येणार आहे.
महाडमधील तारिक गार्डन दुर्घटनेतील मृतांच्या वारसांना 64 लाखांचा मदतनिधी मंजूर
शासनाच्या धोरणानुसार महाड येथील तारिक गार्डन ही पाच मजली निवासी इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना, वारसांना व जखमींना मदत देण्यासाठी कोकण विभागीय आयुक्तांनी निधी वितरित करण्याची विनंती केली होती. त्यानुषंगाने शासनाने 64 लाख रुपये मंजूर केले आहेत. ही रक्कम मृत व्यक्तींच्या वारसांच्या बँक खात्यांमध्ये थेट जमा करण्यात येणार आहे.
मोडकळीस आलेल्या, जीर्ण झालेल्या इमारती रिकाम्या करण्याबाबत स्थानिक प्राधिकरणाने रहिवाशांना नोटीस दिलेली नाही. अशा निवासी इमारत कोसळण्याच्या घटनांमध्ये मृत व जखमी होणाऱ्या व्यक्तींना मदत देण्याचे शासनाचे धोरण आहे. महाड येथे पाच मजली इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना/वारसांसाठी मदतीची मागणी करण्यात येत होती. पालकमंत्री आदिती तटकरे यांनी हा निधी मिळण्यासाठी पाठपुरावा केला होता.
शासनाच्या धोरणानुसार महाड येथील तारिक गार्डन ही पाच मजली निवासी इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत मृत व्यक्तींच्या कुटुंबीयांना, वारसांना व जखमी झालेल्या व्यक्तींना मदत देण्यासाठी विभागीय आयुक्त कोकण यांनी निधी वितरित करण्याची विनंती केली होती. त्यानुषंगाने शासनाने 64 लाख रुपये मंजूर करून हा निधी संबंधितांना वितरीत करण्यास मंजुरी दिली आहे.