रायगड - जागतिक मराठी अकादमीचे 17 वे 'शोध मराठी मनाचा' साहित्य संमेलन अलिबाग येथे होणार आहे. 7, 8 आणि 9 जानेवारी रोजी पीएनपी नाट्यगृहामध्ये हे संमेलन होणार आहे. मराठी माणूस हा जगात वेगवेगळ्या ठिकाणी आपला व्यवसाय, नोकरी करत असतो. त्यांने आपली जडण घडण कशी केली याबाबतची माहिती नवतरुणांना मिळावी, यासाठी हे संमेलन आयोजित केल्याची माहिती जेष्ठ कवी, माजी आमदार रामदास फुटाणे यांनी दिली.
अलिबागमध्ये रंगणार 'शोध मराठी मनाचा' साहित्य संमेलन - मराठी अकादमीचे साहित्य संमेलन
जागतिक मराठी अकादमीचे 17 वे शोध मराठी मनाचा साहित्य संमेलन अलिबाग येथे होणार आहे. 7, 8 आणि 9 जानेवारी रोजी पीएनपी नाट्यगृहामध्ये हे संमेलन होणार आहे.
जागतिक मराठी अकादमीचे 17 वे संमेलन ३ दिवस चालणार आहे. या संमेलनाचे अध्यक्ष सुप्रसिद्ध दिगदर्शक नागराज मंजुळे आहेत. तसेच या संमेलनात साहित्यिक, कलाकार, उद्योजक, कवी, राजकारणी सहभागी आहेत. अमेरिका, दुबई, फ्रान्स, लंडन येथील मराठी साहित्यिक संमेलनात सहभागी होणार आहेत. हे संमेलन फक्त साहित्य संमेलन नाही, नाट्य संमेलनही नाही. तर ज्या व्यक्तीने शून्यातून आपले जीवन उजळवले आहे. अशा व्यक्तींचा जीवनकाळ अनुभवण्याचा अनुभव या संमेलनामार्फत तरुणांना प्रेरणादायी ठरणार आहे. त्यामुळे अलिबागसह रायगडकरांनी या संमेलनाला भरभरून प्रतिसाद देण्याचे आवाहन रामदास फुटाणे यांनी पत्रकार परिषदेत केले आहे.