महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिवस्वराज्य यात्रेची महाड येथे सांगता

राष्ट्रवादी काँग्रेसची शिवस्वराज्य यात्रा आज रायगडमध्ये पोहोचली असून आज महाड येथे या यात्रेची सांगता होणार आहे.

शिवस्वराज्य यात्रा

By

Published : Sep 21, 2019, 4:53 PM IST

रायगड- राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिवस्वराज्य यात्रेची आज रायगडातील महाड येथे सांगता होत आहे. आज ही शिवस्वराज्य यात्रा रायगडात पोहोचली. येथील जाहीर सभेनंतर या यात्रेची सांगता होणार आहे.

शिवस्वराज्य यात्रेची सांगता

हेही वाचा - जनतेचा आशिर्वाद आम्हालाच! 'राज्यात भाजप महायुतीचेच सरकार येईल'

आज महाडमध्ये जाहीर सभा होणार असून या सभेत शिवस्वराज्य यात्रेची सांगता होईल. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी किल्ले रायगडावर जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केले. तेथे त्यांनी शिवप्रभूंच्या समाधीचे दर्शन घेतले. राष्ट्रवादीचे नेते व खासदार अमोल कोल्हे, जयंत पाटील, सुनील तटकरे, रूपाली चाकणकर यावेळी उपस्थित होते.

हेही वाचा - शिवसेना ५०-५० फॉर्म्युलावर ठाम; भाजप-सेना जुळे भाऊ - संजय राऊत

सरकारच्या चुकीच्या धोरणाविरोधात जोरदार आक्रमक झालेली राष्ट्रवादी काँग्रेसची शिवस्वराज्य यात्रा आता तिसर्‍या टप्प्यात विदर्भातून 9 सप्टेंबरपासून सुरू झाली होती. 5 ऑगस्टला शिवनेरीवरुन शिवस्वराज्य यात्रेची सुरुवात झाली. त्यानंतर दुसरा टप्पा संत एकनाथ महाराज यांच्या पैठण येथील समाधीचे दर्शन घेवून सुरु करण्यात आला होता. शिवस्वराज्यच्या दोन्ही टप्प्यांना मोठा प्रतिसाद मिळाल्यानंतर आता तिचा तिसरा टप्प्याची आज सांगता होत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details