महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अलिबागसह श्रीवर्धन मतदारसंघात भगवा फडकणार - आदेश बांदेकर - शिवसेना सचिव आदेश बांदेकर

महाराष्ट्राचे लाडके भावोजी शिवसेना सचिव आदेश बांदेकर यांनी जिल्ह्यातील माणगाव, रोहा, अलिबाग येथे माऊली संवाद मेळावा घेतला. या मेळाव्याला महिलांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला.

आदेश बांदेकर

By

Published : Oct 17, 2019, 10:34 AM IST

रायगड - महाराष्ट्राचे लाडके भावोजी शिवसेना सचिव आदेश बांदेकर यांनी जिल्ह्यातील माणगाव, रोहा, अलिबाग येथे माऊली संवाद मेळावा घेतला. या मेळाव्याला महिलांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. महिलांचा मोठ्या प्रमाणातील प्रतिसाद पाहता अलिबाग आणि श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघात भगवा फडकल्याशिवाय राहणार नसल्याचा विश्वास यावेळी आदेश बांदेकर यांनी व्यक्त केला.

आदेश बांदेकर यांनी श्रीवर्धन व अलिबाग विधानसभा मतदारसंघात माऊली संवाद दौरा केला. सकाळच्या सत्रात माणगाव व रोहा येथे महायुतीचे उमेदवार विनोद घोसाळकर यांच्या प्रचार फेरीत सहभाग घेऊन महिलांशी संवाद साधला. सायंकाळी अलिबाग येथे महायुतीचे उमेदवार महेंद्र दळवी यांच्या प्रचारार्थ चेंढरे बायपास येथे महिलांबरोबर माऊली संवाद साधला.

अलिबागसह श्रीवर्धन मतदारसंघात भगवा फडकणार - आदेश बांदेकर

हेही वाचा - भाजप-सेना हे मस्तावलेले सरकार - प्रकाश आंबेडकर

हेही वाचा -पवार-फडणवीस आज नाशिकमध्ये आमने-सामने

माऊली संवाद या कार्यक्रमाला मोठ्या संख्येन महिला सहभागी झाल्या होत्या. एरवी अबोल असणार्‍या महिलांनी आपल्या लाडक्या भावोजींशी मनमुराद गप्पा मारल्या. काही झाले तरी आम्ही महेंद्र दळवी यांना विजयी करणारच. आम्ही तसा निर्धार केला आहे. असे वचन माऊलींनी आदेश बांदेकर यांना दिले. शिवसेने आपल्याला काय दिले? असा प्रश्‍न एका महिलेने विचाराल. त्याल उत्तर देताना बांदेकर म्हणाले, शिसेनाप्रमुखांनी माणूसकीने दुसर्‍यासाठी काम करण्याचे संस्कार दिले. महिलांच्या चेहर्‍यावर आनंद, हासू आणण्याचे तसेच आम्हाला गाय आणि माय सुरक्षीत ठेवण्याचे विचार दिल्याचे बांदेकर म्हणाले.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे राज्यातील घर, घरातील प्रत्येक माणसाच्या सुख समाधानासाठी झटत आहेत. युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे हेसुद्धा पायाला भिंगरी लाऊन राज्यात फिरत आहेत. युवकांचे, महिलांचे, शेतकऱ्यांचे प्रश्न जाणून घेत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details