रायगड - फाल्गुन वद्य तृतीया म्हणजे तिथीप्रमाणे साजरी होणाऱ्या शिवजयंतीला रायगडमध्ये मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला. शिवप्रेमींसाठी तीर्थक्षेत्र असलेल्या किल्ले रायगडावरून शिवज्योत आणण्यात आल्या. जिल्ह्यासह नवी मुंबई, सातारा, भोर या ठिकाणच्या शिवप्रेमी मंडळांनी या शिवज्योती आणल्या.
शिवजयंती उत्सवास प्रारंभ; रायगडहून आलेल्या ज्योतींचे नाते खिंड येथे स्वागत - festival
शुक्रवारी 22 मार्चला सायंकाळपासून ही मंडळे ज्योत आणण्यासाठी गडावर गेली होती. रात्रभर धावुन पहाटे या शिवज्योती महाडमध्ये पोहोचल्यानंतर नाते खिंड येथे त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले.
रायगडमध्ये शिवजयंती उत्सवास प्रारंभ
शुक्रवारी २२ मार्चला सायंकाळपासून ही मंडळे ज्योत आणण्यासाठी गडावर गेली होती. रात्रभर धावुन पहाटे या शिवज्योती महाडमध्ये पोहोचल्यानंतर नाते खिंड येथे त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी शिवप्रेमींमध्ये अलोट उत्साह होता. या शिवज्योती गावोगाव पोहोचल्यानंतर शिवजयंती उत्सव साजरे केले जातील.