महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

रायगडमध्ये शिवजयंतीनिमित्त भव्य मिरवणुकीचे आयोजन

रायगडमध्येही ठिकठिकाणी शिवजयंतीनिमित्त मिरवणुका व भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

By

Published : Feb 19, 2019, 1:46 PM IST

Raigad

रायगड- महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आज राज्यभरात मोठ्या उत्साहात साजरी होत आहे. रायगडमध्येही ठिकठिकाणी शिवजयंतीनिमित्त मिरवणुका व भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. अलिबाग शहरात मावळा प्रतिष्ठानतर्फे शिवाजीनिमित्त ढोल ताशांच्या गजरात भव्य मिरवणूक काढण्यात आली होती.

छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती ही शिवभक्तांसाठी एक पर्वणीच असते. अलिबाग शहरातील राम मंदीर येथून या मिरवणुकीला सुरुवात झाली. यावेळी सर्व शिवभक्त भगवे फेटे घालून पारंपरिक वेशभूषेत या मिरवणुकीत सामील झाले होते. मिरवणुकीचे आकर्षण म्हणजे भव्य अशी तुळजाभवानीची प्रतिकृती या ठिकाणी तयार करण्यात आली होती. त्याचबरोबर पुलमावा येथे वीरमरण आलेल्या जवानांना शिवभक्तांकडून श्रद्धांजली वाहण्यात आली. तर मिरवणुकीत लहान मुलांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि मावळ्यांची वेशभूषा केली होती.

ढोल ताशांच्या गजरात शिवरायांची मिरवणूक काढण्यात आली होती. यावेळी मैदानी कवायतीच्या कसरती शिवभक्तांनी सादर केल्या. शिवाजी महाराज यांची मिरवणूक राममंदिरपासून महावीर चौक, शेतकरी भवन, ठिकरूळ नाका, जामा मशीदमार्गे शिवाजी पुतळ्यापर्यंत काढण्यात आली होती. या मिरवणुकीत शहरातील नागरिक मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते.

ABOUT THE AUTHOR

...view details