रायगड -आजकोकणातकेंद्रीय मंत्री नारायण राणे यांची जनआशीर्वाद यात्रा सुरू आहे. पाली बल्लाळेश्वर दर्शन घेऊन या यात्रेला सुरुवात झाली. यावेळी त्यांनी शिवसेनेवर शाब्दीक हल्ला चढवला. 'शिवसेनेने आमच्यावर टीका केली. तर आम्ही त्यांची पोलखोल करु शकतो. त्यामुळे शिवसेना उत्तर देणार नाही, असे नारायण राणेंनी म्हटले.
जनआशीर्वाद यात्रेनिमित्त ठिकठिकाणी पोलीस फाटा तैनात -
राज्यात भाजपाच्यावतीने नव्याने केंद्रीय मंत्रिमंडळात सहभागी झालेल्या केंद्रीय मंत्र्यांनी जनतेचे आशीर्वाद घेऊन कामाला प्रारंभ करण्याचा संकल्प केला आहे. राज्यात जन आशीर्वाद यात्रेचा झंजावत व जनतेकडून उत्स्फूर्त स्वागत होते आहे. केंद्रीय मंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर आता उद्योग मंत्री नारायण राणे हे कोकणात भारतीय जनता पक्षाचा जनाधार व पक्षसंघटना मजबूत व बलाढ्य करण्याच्या दृष्टीने सरसावले आहेत. त्यासाठी नारायण राणे ‘जन आशीर्वाद’ यात्रेला प्रारंभ झाला आहे. पाली बल्लाळेश्वरचे दर्शन घेऊन दक्षिण रायगडची जन आशीर्वाद यात्रेला प्रारंभ झाला. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील यांनी जन आशीर्वाद यात्रेला हिरवा झेंडा दाखविला. पालीवरून वाकण फाटा येथे यात्रेचे स्वागत होणार आहे. यात्रेनिमित्त सगळीकडे बॅनर बाजी करण्यात आली आहे. जन आशीर्वाद यात्रेनिमित्त ठिकठिकाणी पोलीस फाटा तैनात करण्यात आला आहे.
हेही वाचा - कोळी बांधवांना मुंबईबाहेर फेकण्याचे काम कोण आणि का करत आहे - संदीप देशपांडे