महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

रवीशेठ पाटील यांचा विक्रमी विजय, काँग्रेस उमेदवारासह 11 उमेदवारांचे डिपॉझिट जप्त

पेण विधानसभा मतदारसंघात 14 उमेदवार आपले नशीब आजमावत होते. यात भाजप, शेकाप, काँग्रेस, वंचित बहुजन आघाडी, बसपा आणि नऊ अपक्ष असे उमेदवार उभे होते. यामध्ये मुख्य लढत ही शेकाप राष्ट्रवादी आघाडीचे विद्यमान आमदार धैर्यशील पाटील आणि भाजप-शिवसेना युतीचे उमेदवार रविशेठ पाटील यांच्यात दुरंगी लढत झाली. काँग्रेस पक्षाच्या नंदा म्हात्रे यांनी स्वतंत्र पणे निवडणूक लढवली मात्र त्यांना 2291 मते मिळून त्यांचे डिपॉझिट जप्त झाले. तर 2456 मतदारांनी नोटा ला पसंती दिली.

रवीशेठ पाटील यांचा विक्रमी विजय, काँग्रेस उमेदवारासह 11 उमेदवारांचे डिपॉझिट जप्त

By

Published : Oct 24, 2019, 6:16 PM IST

रायगड- पेण-सुधागड-रोहा विधानसभा मतदार संघात पहिल्यांदाच भाजपचे कमळ फुलले आहे. या निवडणुकीत शिवसेना भाजप युतीचे रवीशेठ पाटील यांनी शेकापचे विद्यमान आमदार धैर्यशील पाटील यांचा तब्बल 23 हजार 595 इतक्या मोठ्या मताधिक्क्यांनी पराभव करुन विजयाची हॅट्ट्रीक रोखली. रवीशेठ पाटील यांना एक लाख 11 हजार 309 मते मिळाली. तर आमदार धैर्यशील पाटील यांना 87 हजार 714 मते मिळाली. काँग्रेसच्या उमेदवार नंदा म्हात्रे यांना फक्त 2291 मते मिळाल्याने त्यांचे व इतर 11 उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले.

रवीशेठ पाटील यांचा विक्रमी विजय, काँग्रेस उमेदवारासह 11 उमेदवारांचे डिपॉझिट जप्त

पेण विधानसभा मतदारसंघात 14 उमेदवार आपले नशीब आजमावत होते. यात भाजप, शेकाप, काँग्रेस, वंचित बहुजन आघाडी, बसपा आणि नऊ अपक्ष असे उमेदवार उभे होते. यामध्ये मुख्य लढत ही शेकाप राष्ट्रवादी आघाडीचे विद्यमान आमदार धैर्यशील पाटील आणि भाजप-शिवसेना युतीचे उमेदवार रविशेठ पाटील यांच्यात दुरंगी लढत झाली. काँग्रेस पक्षाच्या नंदा म्हात्रे यांनी स्वतंत्र पणे निवडणूक लढवली मात्र त्यांना 2291 मते मिळून त्यांचे डिपॉझिट जप्त झाले. तर 2456 मतदारांनी नोटा ला पसंती दिली.

पेण विधानसभा मतदार संघाची मतमोजणी आज पेण येथील के.ई. एस. इंग्लिश मीडीयम स्कुल मध्ये कडेकोट बंदोबस्त मध्ये पार पडली. मतमोजणीच्या पहिल्या फेरी पासूनच भाजप-शिवसेना युतीचे उमेदवार रवीशेठ पाटील यांनी आघाडी घेतली होती. ही आघाडी शेवटच्या 27 वी फेरी पर्यंत वाढतच गेली. शेकापचा बालेकिल्ला असलेल्या पेण पूर्व विभागात देखील रवीशेठ पाटील यांनी जोरदार मुसंडी मारून शेकापला रोखून धरले. तसेच मतदार संघातील पाली, सुधागड, नागोठणे, रोहा या विभागात देखील जनतेने रवीशेठ पाटील यांना कौल दिला.

भाजप शिवसेना युतीचा नियोजनबद्ध प्रचार, या बरोबरच मागील दहा वर्षातील शेकापच्या आमदाराला विकासकामे करण्यात आलेले अपयश ही शेकापच्या पराभवाला मुख्य कारणीभूत ठरले आहे. या बरोबरच पेण खारेपाट विभागातील पाणी प्रश्न सोडविण्यात आलेले अपयश यामुळे पेण खारेपाट विभागातील जनतेने शेकापला पूर्णपणे नाकारले असल्याचे समोर आले आहे. या मतदार संघात ७१ टक्के मतदान झाले होते. वाढलेला मतदानाचा टक्का याचा भाजपला फायदा झाल्याचे चित्र दिसत आहे. भाजपच्या विकासाच्या मुद्द्याला जनतेने कौल दिला असल्याचे आजच्या निकालाने स्पष्ट केले आहे.

मतमोजणी पूर्ण होताच भाजप शिवसेनेच्या उत्साही कार्यकर्त्यांकडून ढोल-ताश्यांच्या गजरात पेण शहरातून मिरवणूक काढण्यात आली. यावेळी जेष्ठ नेते बाळाजी म्हात्रे, माजी सरपंच राजेश मापारा, माजी सभापती संजय जांभळे, गट नेते निवृत्ती पाटील, मिलिंद पाटील, किशोर जैन, नरेश गावंड, कौसल्या पाटील, प्रीतम पाटील आदी सहभागी झाले होते.

ABOUT THE AUTHOR

...view details