रायगड - किल्ले रायगडच्या पायथ्याशी चित्त दरवाजा येथे पुरातत्व विभागाने उभारलेले तिकीट घर शिवसैनिकांनी उखडून फेकून दिले आहे. आमदार भरत गोगावले यांच्या उपस्थितीत हे तिकीट घर शिवसैनिकांनी काढून टाकले आहे. त्यामुळे चित्त दरवाजा मोकळा झाला आहे.
शिवसैनिकांनी उखडली तिकीट घराची टपरी
किल्ले रायगडाच्या पायथ्याशी चित्त दरवाजा येथे केंद्रीय पुरातत्व विभागाने तिकिट घर उभारले होते. या उभारलेल्या तिकिट घरामुळे पार्किंग, बस सारख्या मोठ्या वळणाला त्रासदायक बनले होते. तिकीट घरामुळे चित्त दरवाजा येथील पायऱ्यांचे विद्रुपीकरण झाले असल्याचे शिवप्रेमींचे म्हणणे होते. त्याच बरोबर कोणत्याच सुविधा न देता पुरातत्व खाते तिकीटाच्या रुपाने पैशाची वसुली करणार होते. याबाबत संताप व्यक्त करत शिवप्रेमी आणि शिवसैनिकांनी तिकीट घररुपी टपरी रायगडच्या पायथ्यापासुन बाजुला केली.