रायगड Maratha reservation: मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून महाराष्ट्र सरकारवर दबाव वाढत असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शुक्रवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधलाय. आश्वासन पाळता येत नसतील तर आश्वासनं देऊ नयेत असं टीकास्त्र शरद पवारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर सोडलंय.
आश्वासनं पाळता येत, नसतील तर देऊ नये : "मनोज जरांगे यांना दिलेल्या वेळेत सरकार आरक्षणाचा निर्णय घेईल, असं आश्वासन दिलं होतं. मात्र, ते आश्वासन पूर्ण झाल्याचं दिसत नाही. त्यामुळं आश्वासनं पाळता येत नसतील तर देऊ नये, असं शरद पवार यांनी म्हटलंय. अंदोलकांनी सरकारला वेळ दिली होती. त्यामुळं आता उपोषणकर्त्यांना दोष देता येणार नाही, असं शरद पावारांनी सांगितलं.
आरक्षण देण्यात अपयश : मराठ्यांना आरक्षण मिळावं, म्हणून मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी गावात बेमुदत उपोषण सुरू केलंय. त्यावरुन शरद पवारांनी मुख्यंमंत्री एकनाथ शिंदे सरकारवर निशाना साधलाय. पत्रकारांशी बोलताना पवार म्हणाले, मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी जरांगे यांनी मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला होता. त्यावेळी सरकारनं त्यांना वेळ मागितला होता. मात्र, 30 दिवसाच्यानंतरही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना मराठा समाजाला आरक्षण देण्यात अपयश आलं आहे. त्यामुळं मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा उपोषण सुरू केल्याचं शरद पवार यांनी म्हटलंय.