रत्नागिरी - विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हेही नुकसानीची पाहणी करण्यासाठी कोकण दौऱ्यावर येणार आहेत. याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना विचारलं असता, त्यांनी देवेंद्र फडणवीसांना टोला लगावला.
समुद्राचा आणि नागपूरचा काही संबध नाही, पवारांचा फडणवीसांना टोला - शरद पवारांचा फडणवीसांना टोला
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हेही नुकसानीची पाहणी करण्यासाठी कोकण दौऱ्यावर येत आहेत. याबद्दल शरद पवारांना विचारलं असता, त्यांनी फडणवीसांना टोला लगावला.

पवारांचा फडणवीसांना टोला
पवारांचा फडणवीसांना टोला
फडणवीस कोकण दौऱ्यावर येत आहेत हे चांगलं आहे. सर्वांना कळलं पाहिजे किती नुकसान झालं आहे ते, प्रत्येकजण वेगवेगळ्या भागातून येतो. मी दुष्काळी भागातून येतो, ते नागपुरातून येतील. समुद्राचा आणि नागपूरचा काही संबंध नाही. पण त्यामुळे सर्वांच्या ज्ञानात भर पडते, आमच्याही आणि त्यांच्याही, असा टोला पवारांनी लगावला. तेव्हा ते येताहेत ही चांगली गोष्ट आहे, असेही पवार म्हणाले.
Last Updated : Jun 10, 2020, 9:31 PM IST