नवी मुंबई- गेल्या काही दिवसांपासून नवी मुंबई परिसरात सापांचा मानवी वस्तीत मोठ्या प्रमाणात वावर वाढला आहे. विशेषतः खाडी किनाऱ्यालगत असणाऱ्या इमारतीच्या परिसरात हे सरपटणारे प्राणी आढळत आहेत. घणसोली परिसरात सात फुटांचा भव्य असा अजगर आढळून आल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. या अजगराला सर्पमित्राच्या मदतीने गवळीदेव येथील जंगलात सोडण्यात आले आहे.
नवी मुंबईतील घणसोलीत आढळला सात फुटांचा अजगर - अजगर बातमी नवी मुंबई
घणसोली येथील जेट्टी खाडीकिनाऱ्यावरील श्री चेरदेव परिसरात एक सात फूट लांबीचा अजगर आढळून आला आहे. हा अजगर मच्छीमार निवारा शेडजवळ दिलीप पाटील या मच्छीमारास दिसला. त्यांनी याची माहिती सर्पमित्र सुरेश खरात यांनी दिली. सुरेश यांनी या अजगराला पकडले.

हेही वाचा-नागरिकत्व दुरुस्ती विधेयक उद्या लोकसभेत, भाजपने जारी केला व्हीप
घणसोली येथील जेट्टी खाडीकिनाऱ्यावरील श्री चेरदेव परिसरात एक सात फूट लांबीचा अजगर आढळून आला आहे. हा अजगर मच्छीमार निवारा शेडजवळ दिलीप पाटील या मच्छीमारास दिसला. त्यांनी याची माहिती सर्पमित्र सुरेश खरात यांनी दिली. सुरेश यांनी या अजगराला पकडले. या अजगराचे वजन जवळपास १३ ते १४ किलो आहे. सर्पमित्र सुरेश यांनी या अजगराला पकडून गवळीदेव परिसरातील जंगलात सोडले आहे. नवी मुंबईतील ऐरोली घणसोली रबाळे सिवूडस नेरुळ व बेलापूर परिसरात साप व अजगर आढळल्याच्या घटना वारंवार घडत आहेत. मात्र, सर्प मित्रांच्या साह्याने त्यांना जीवदान देण्यात येत आहे.