महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सुरक्षा रक्षकानेच केली युनिव्हर्सिटीत चोरी, पनवेलच्या अमिटी युनिव्हर्सिटीतील प्रकार

त्यात अमिटी युनिव्हर्सिटीमधलाच सुरक्षा रक्षक  उदय मदन भगत हा घटनेच्या वेळी क्लासरूम मध्ये जाताना दिसला. त्यानंतर थोड्याच वेळात तो क्लासरूममधील दोन यूपीएस हातात घेऊन बाहेर पडताना आढळून आला.

अमिटी युनिवर्सिटी

By

Published : Nov 19, 2019, 1:59 AM IST

पनवेल - सोमटणे येथील अमिटी युनिव्हर्सिटीमधील क्लासरूममधून यूपीएसची चोरी करणाऱ्या एका सुरक्षा रक्षकाला अटक करण्यात आली आहे. उदय भगत असे या सिक्युरिटी गार्डचे नाव आहे. या चोरीचा उद्देश मात्र अद्याप उघड झाला नाही.


काही दिवसांपूर्वी ११ नोव्हेंबर रोजी पनवेलच्या अमिटी युनिव्हर्सिटीतील क्लासरूम नंबर ३०५ आणि ३२२ मधून दोन यूपीएस चोरीला गेले होते. याबाबत तिथल्या कर्मचाऱ्यांनी युनिव्हर्सिटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना ही माहिती दिल्यानंतर घटनेच्या दुसऱ्या दिवशी सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करण्यात आली. त्यात अमिटी युनिव्हर्सिटीमधलाच सुरक्षा रक्षक उदय मदन भगत हा घटनेच्या वेळी क्लासरूम मध्ये जाताना दिसला. त्यानंतर थोड्याच वेळात तो क्लासरूममधील दोन यूपीएस हातात घेऊन बाहेर पडताना आढळून आला.

हेही वाचा -माणगाव स्फोट प्रकरण : क्रिपझो कंपनीच्या मालक आणि संचालकांवर गुन्हा दाखल

उदय भगत हा द टॅलेंट टीम सिक्युरिटी या संस्थेच्या माध्यमातून अमिटी युनिव्हर्सिटीत नव्यानेच सुरक्षा रक्षक म्हणून कामाला लागला होता. क्लासरूममधील यूपीएस चोरी भगत यानेच केल्याचे स्पष्ट दिसल्यानंतर अमिटी युनिव्हर्सिटीच्या वरीष्ठ अधिकाऱ्यांनी पनवेल तालुका पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी गुन्हा नोंदवला. त्यानुसार पनवेल पोलिसांनी ताबडतोब उदय भगत याला अटक केली.

ABOUT THE AUTHOR

...view details