रायगड- कोरोना हा भयानक विषाणू सध्या जगभर झपाट्याने पसरत आहे. शासन आणि प्रशासन वारंवार जनतेला आपली काळजी घेण्यासाठी पोटतिडकीने आवाहन करत आहे. मात्र, जनता अजूनही या विषाणूबाबत गंभीर नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे, दिघी येथील चौथीत शिकणारी संस्कृती राजकुमार कोलथरकर हिने कोरोनाबाबत जनजागृती करण्यासाठी एक गीत तयार केले आहे.
रायगडच्या संस्कृतीने कोरोना जनजागृतीसाठी बनवले गीत...एकदा ऐकाच हे भन्नाट गीत - raigad
जनता अजूनही या विषाणूबाबत गंभीर नसल्याचे समोर येत आहे. त्यामुळे, दिघी येथील चौथीत शिकणारी संस्कृती हिने कोरोनाबाबत जनजागृती करण्यासाठी एक गीत तयार केले आहे.
गीत सादर करताना संस्कृती राजकुमार कोलथरकर
संस्कृतीने सैराट सिनेमातील झिंग झिंग झिंगाट या गाण्याच्या चालीवर कोरोना जंनगृतीबाबत एक गीत तयार केले आहे. तिचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ऐका संस्कृतीने तयार केलेले हे भन्नाट गीत.
हेही वाचा-अलिबागमध्ये मोकाट फिरणाऱ्या 'होम क्वारंटाईन' व्यक्तीवर गुन्हा दाखल