रायगड - आदिलशाह आणि मुघलांनी शिवाजी महाराजांची ( Sambhaji Raje on Shivrajyabhishek raigad ) घोडदौड थांबविण्यासाठी शिवाजी महाराज आणि शहाजीराजे यांच्यात भांडणे लावण्याचा प्रयत्न केला. शहाजीराजांवर दबाव टाकला जात होता. काळ बदलला असला, तरी आजही सत्तेसाठी तशीच दबंगगिरी सुरू आहे. राज्यसभेच्या जागेवरून सत्तेसाठी ( Sambhaji raje on rajya sabha election ) बापलेकात भांडण लावण्याचा प्रयत्न सुरू आहे, असा गंभीर आरोप छत्रपती संभाजीराजेंनी ( Sambhaji raje raigad news ) केला आहे.
हेही वाचा -खालापूर तालुक्यातील रानसई हद्दीत सापडला महिलेचा मृतदेह
रायगड किल्ल्यावर ढोल ताशांचा गजर, मंत्रोच्चार आणि शंखनादाच्या गजरात शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी हजारो शिवभक्तांनी गडावर हजेरी लावली. शिवराज्याभिषेक दिन उत्सव समिती दुर्गराज रायगड यांच्यावतीने सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. आपला सन्मान राखला जाईल तिथेच थांबायचे, वाकायचे नाही, ही शिकवण शिवाजी महाराजांनी दिली आहे. त्यांनी अनेक तह केले, पण तह करताना स्वाभिमानाशी तडजोड केली नाही. त्यांना सत्ता नको होती. स्वराज्य पाहिजे होते. हे स्वराज्य पुन्हा आपल्याला उभे करायचे आहे, असे देखील यावेळी संभाजी राजे यांनी सांगितले.
हेही वाचा -Raigad Crime : महाडमध्ये मुलांसह महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न; सहा चिमुकल्यांचा मृत्यू