महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कोकणात आज झाली साखरचौथ गणरायाची प्राणप्रतिष्ठापना - रायगड साखरचौथ गणेशोत्सव न्यूज

कोकणात घराघरात भाद्रपद महिन्यात येणारी गणेश चतुर्थी साजरी केली जात असल्याने साखरचौथीचा गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जात नव्हता. मात्र, अलिकडच्या काळात साखरचौथीच्या गणेशोत्सवाचेही आयोजन करण्यात येऊ लागले आहे. भाद्रपद महिन्यातील मुख्य गणेशोत्सव संपल्यानंतर वद्य संकष्टी चतुर्थीला हा साखरचौथ गणेशोत्सवाचे आयोजन केले जाते.

Lord Ganesha
गणपती

By

Published : Sep 5, 2020, 5:19 PM IST

रायगड -जिल्ह्यात 364 सार्वजनिक तर, 314 घरगुती साखरचौथीच्या गणेश मूर्तींची शनिवारी प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. रायगड जिल्ह्यात साखरचौथीच्या गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. मात्र, यावर्षी कोरोना संकट असल्याने गणेशोत्सवाप्रमाणे साखरचौथ गणरायाचे आगमनही साधेपणाने झाले.

साखरचौथ गणरायाची प्राण प्रतिष्ठापना

कोकणात घराघरात भाद्रपद महिन्यात येणारी गणेश चतुर्थी साजरी केली जात असल्याने साखरचौथीच्या गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जात नव्हता. मात्र, अलिकडच्या काळात साखरचौथीच्या गणेशोत्सवाचेही आयोजन करण्यात येऊ लागले आहे. भाद्रपद महिन्यातील मुख्य गणेशोत्सव संपल्यानंतर वद्य संकष्टी चतुर्थीला हा साखरचौथ गणेशोत्सवाचे आयोजन केले जाते. काही ठिकाणी दीड दिवस, तीन दिवस व पाच दिवस हा गणेशोत्सव साजरा केला जातो.

रस्त्या लगत मोठे सभामंडप, आकर्षक रोषणाई, भव्यदिव्य विसर्जन मिरवणुका, सांस्कृतिक कार्यक्रम ही या गणेशोत्सवाची ओळख बनली आहे. कुठलेही धार्मिक अधिष्ठान नसताना केवळ सामाजिक अधिष्ठानाच्या जोरावर हा गणेशोत्सव साजरा करण्याकडे कल वाढत असल्याचे दिसून येत आहे. गेल्या काही वर्षात साखरचौथी गणेशोत्सव मंडळांची संख्याही वाढत आहे.

प्रामुख्याने अलिबाग, पेण, पनवेल, उरण, रोहा या परीसरात साखचौथीचा गणेशोत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो. पेण तालुक्यात या गणेशोत्सवाला गणपती बनवणाऱ्या मूर्तीकारांचा उत्सव असेही संबोधले जाते. पेणमध्ये वर्षभर गणपती बनवण्याचे काम सुरू असते. वर्षभरात या परीसरातून जवळपास 20 लाख गणेशमूर्ती बनवल्या जातात. भाद्रपद महिन्यातील गणेशोत्ससाठी त्या देशाविदेशात पाठवल्या जातात. या कामात गणपती व्यवसायिकांना आपल्या घरी मुख्य गणेशोत्सव साजरा करता येत नाही. त्यामुळे वद्य चतुर्थीला हे मूर्तीकार आपल्या घरी गणपती बसवतात. या गणपतीच्या विसर्जनानंतर पुढील वर्षासाठी गणेश मूर्ती बनवण्याचे काम सुरू केले जाते. उत्तर कोकणात या गणपतीला साखरचौथीचा तर, तळ कोकणातील काही भागात याला गौरा गणपती असे संबोधले जाते.

कोरोना संकट असल्याने साखरचौथीच्या गणरायाचे आगमनही साधेपणाने करण्यात आले. सार्वजनिक मंडळांनीही यावर्षी कोणतीही रोषणाई, देखावे न करता साधेपणाने गणरायाची प्राणप्रतिष्ठापन केली आहे. रायगड पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या हद्दीत शनिवारी 364 सार्वजनिक आणि 314 घरगुती साखरचौथीच्या गणपतींची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली.

ABOUT THE AUTHOR

...view details