रायगड - खोपोलीत आज संविधान समर्थक मंचच्या वतीने CAA व NCR च्या विरोधात भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. जवळपास 7 ते 8 हजार पुरुष महिला या मोर्चात सहभागी झाल्या होत्या. तर भाजप सोडून सर्वच पक्षाचे पदाधिकारीही या मोर्चात सामिल झाले होते. तर सर्वाना मार्गदर्शन करण्यासाठी कॉंग्रेसचे प्रदेश प्रवक्ते सचिन सावंत हेही उपस्थित होते.
सचिन सावंत- काँग्रेस प्रवक्ते ज्यांच्या बापजाद्यांनी ब्रिटिशांची चाकरी केली त्यांचे पाय चाटले, ते आता आपल्याकडे नागरिकत्वाचा पुरावा मागत आहेत, अशा शब्दात सचिन सावंत यांनी पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांच्यावर हल्लाबोल केला.
शनिवारी दुपारी 11 वाजता शहरातील शीळफाटा येथून हा मोर्चा खोपोलीच्या मुख्य बाजारपेठ रोड वरुन डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात आला. या ठिकाणी एक छोटेखानी सभा पार पडली. या सभेला सचिन सावंत यांनी संबोधित केले. त्यावेळी त्यांनी मोदी शाह यांच्यावर निशाणा साधला.
पंतप्रधान मोदी व अमित शाह कसे खोटे बोलतात आणि आपल्याला कसे फसवत आहेत यावर सावंत यांनी आपले मत व्यक्त केले. यासोबतच या दोघांच्या धोरणांवर घनाघाती आरोपही केले. या मोर्चात शहरातील जवळपास सात ते आठ हजार लोकांनी सहभाग घेतला होता. त्यात महिला आणि मुस्लीम समाज बांधवांची उपस्थिती लाक्षणीय होती. मोर्चा अगदी शांतातेत पार पडला कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांचाही यावेळी चोख बंदोबस्त तैनात केला होता.