महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कामगारांच्या हितासाठी आमचे झेंडे बाजूला ठेवू - सचिन अहिर - राष्ट्रीय कामगार संघ अध्यक्ष न्यूज

महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघाने टाटा स्टील आणि महिंद्रा सँनिओ पोलाद उत्पादन कारखान्याच्या व्यवस्थापनाकडे वारंवार वेतनवाढीची मागणी लावून धरली. त्यानंतर टाटा स्टील आणि महिंद्रा सँनिओ कारखान्यातील कामगारांना भरघोस पगारवाढ मिळाली आहे.

press meet of Sachin Ahir
सचिन अहिर यांची पत्रकार परिषद

By

Published : Feb 27, 2021, 8:06 PM IST

रायगड- टाटा स्टील आणि महिंद्रा सँनिओ पोलाद उत्पादन कारखान्यातील कामगारांना ८ हजाराची भरघोस पगार वाढवून मिळाली आहे. सावरोली येथील टाटा स्टील आणि खोपोली शहरातील महिंद्रा सँनिओ कारखान्यातील पगारवाढीचा करार नुकताच झाला आहे. याबाबतची माहिती पत्रकार परिषदेत महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघाचे अध्यक्ष, मंंत्री तथा शिवसेना उपनेते सचिन अहिर यांनी दिली आहे.

अल्पवेतन असल्यामुळे वाढलेल्या महागाईत टाटा स्टील आणि महिंद्रा सँनिओमधील कर्मचाऱ्यांना उदरनिर्वाहाची मोठी समस्या निर्माण झाली होती. असे असतानाच महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघाने व्यवस्थापनाकडे वारंवार वेतनवाढीची मागणी लावून धरली. त्यानंतर टाटा स्टील आणि महिंद्रा सँनिओ कारखान्यातील कामगारांना भरघोस पगारवाढ मिळाली आहे.

कामगारांच्या हितासाठी आमचे झेंडे बाजूला ठेवू

हेही वाचा-सुवर्ण रोखे खरेदी करण्याची संधी; प्रति ग्रॅम ४,६६२ रुपये किंमत निश्चित

कारखाना टिकला तरच कामगार जगेल-

पत्रकार परिषदेत बोलताना सचिन आहिर म्हणाले की, कोरोना काळात अनेक उद्योगधंदे बंद झाले आहेत. कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यातच इतर देशातील स्टील आपल्या देशात येत असल्यामुळे स्टील कारखाने आर्थिक संकटात आहेत. उद्योग टिकला तरच कामगार टिकेल याची जाणीव महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघाला आहे. या संघाच्या माध्यमातून कंपनी व्यवस्थापनाशी चर्चा करून 900 कामगारांना 8 हजार पगारवाढ तीन वर्षासाठी करण्यात आली आहे. तर 320 कामगारांना 8,700 पगारवाढीसह महागाई भत्यात 20 टक्के वाढ केली आहे. टाटा कंपनीत बोनस, कामगांराच्या सुरक्षेसाठी व उत्तम दर्जाची कँटीन आदींची तरतुद केली आहे.

हेही वाचा-माध्यमांनी पूजा चव्हाणच्या कुटुंबियांची बदनामी थांबवावी- अ‌ॅड संगीता चव्हाण

सर्व कामगार संघटनांनी एकत्र येण्याची गरज-

300 पेक्षा कमी असणारे कारखाने व्यवस्थापक बंद करू शकतात. या कायद्याविरोधान सर्व कामगार संघटनांनी एकत्र येण्याची गरज आहे. एखादा कारखाना बंद झाल्यावर मालक मजेत राहतो. युनियनवाल्यांना दोषी मानले जाते. कामगारांच्या हितासाठी आमचे झेंडे बाजूला ठेवू, असेही अहिर यांनी म्हटले आहे.

यावेळी राष्ट्रीय कामगार संघाचे जिल्हा सेक्रेटरी संतोष बैलमारे, महिंद्रा सँनिओ कारखान्यातील कार्यकारी संचालक दिलीप पाचपांडे, वरिष्ठ उपाध्यक्ष एचआर अविनाश सोमवंशी, सल्लागार कन्सल्टंट असिफ मुल्ला, सतीश घोगरे, वरिष्ठ व्यवस्थापक प्रकाश बाणे, प्रविण देशमुख, सौरभ मुळेकर, टाटा स्टिलचे निखिल खजूर, एचआर प्रमुख सूब्रोतो ओझा, राजेश कुलकर्णी व उपस्थित होते. दोन्हीही कारखान्यातील नागेश मेहतर, अल्पेश चौधरी, सुमित भेसरे, नितीन पाटील, सुनील देशमुख, पांडुरंग दाभणे, समीर पाटील, रवी पवार, जनार्धन घाटवळ, भाऊ गायकवाड, प्रमोद देशमुख, प्रकाश यादव व नितीन पाटील तसेच युनियन अध्यक्ष रविंद्र कांबळे, नितीन मोरे, योगेश औटी, योगेश थरपुडे, शिवाजी खोपकर, रविंद्र देदुस्कर, प्रल्हाद बट्टेवार, संदेश पाटील आदि उपस्थित होते.

ABOUT THE AUTHOR

...view details